🔥 ट्रेंडिंग जंडावाली क्रिकेट टूर्नामेंट का भव्य श... રાજ્યમંત્રી ત્રિકમભાઈ છાંગાએ બિરસા મું... રાજ્યમંત્રીએ પોશીના વિસ્તારમાં ત્રણ દિ... પાટણમાં SMC ની કાર્યવાહી: રૂ. 18.31 લા... काशी में ककरमत्ता पोखरी का पुनरुद्धार:... उत्तarakhand हाई कोर्ट ने पूर्व सैनिक...
27 नव. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
स्थानीय

उमरी नगर परिषद हद्दीतील चौकाचे नाव बदलण्याचा प्रयत्न; भीम आर्मीने प्रशासनाला दिली कडवी टीका

✍️ रिपोर्टर: G. P. G. U. .7798377959 🗓 27 नव. 2026, 04:53 PM 👁 29
यहाँ देखें: ▶️ YouTube
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

उमरी नगर परिषद हद्दीतील भोकरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील चौकाचे नाव 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक' असे ठरवूनही, काही हॉटेल चालक व दुकानदारांनी आपल्या पत्त्यांवर आणि बॅनरवर मनमानी नावांचा वापर केल्याचा आरोप भीम आर्मीने केला आहे. या प्रकारावर प्रशासनाला सूचना देताना संघटनेने याचे गंभीरतेने निरीक्षण करण्याची मागणी केली आहे.

उमरी नगर परिषद हद्दीतील भोकरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील चौकाचे नाव नगर परिषदेच्या अधिकृत निर्णयानुसार 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक' असे ठरवण्यात आले आहे. मात्र, या परिसरातील काही हॉटेल चालक आणि दुकानदारांनी जाणीवपूर्वक या अधिकृत नावाचा उल्लेख टाळत, आपल्या दुकानांच्या पत्त्यांवर, जाहिरात फलकांवर आणि बॅनरवर मनमानी पद्धतीने अन्य नावांचा वापर करत असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकारावर भीम आर्मी या सामाजिक संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

भीम आर्मीच्या वतीने जारी केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका विशिष्ट समाजाचे महापुरुष नसून ते संपूर्ण देशाचे राष्ट्रनिर्माते, भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि कोट्यवधी जनतेचे प्रेरणास्थान आहेत. अशा महामानवांच्या नावाने अधिकृतरीत्या ओळखल्या जाणाऱ्या चौकाचे नाव जाणीवपूर्वक टाळणे किंवा त्याऐवजी मनमानी नावांचा वापर करणे ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.

या प्रकाराचे निदर्शनास आल्यानंतर भीम आर्मीने नगर परिषद प्रशासनाला स्पष्टपणे सूचित केले आहे की, या मनमानी कारवायांवर कडक कारवाई करावी. या निवेदनावर भीम आर्मी जिल्हा कोषाध्यक्ष नदीम बेग, तालुका उपाध्यक्ष शेख सईद, तालुका कोषाध्यक्ष आदित्य वाघमारे, भीम आर्मी शाखा अध्यक्ष तथागत सूर्यवंशी तसेच तहसील एमआईएम तालुका अध्यक्ष इलियास भा यांनी स्वाक्षरी केली आहे. सोशल मीडियाद्वारे ही माहिती पसरवण्याची जबाबदारी नांदेड जिल्हा गंगाधर गंगासागरे यांनी स्वीकारली आहे.
📲Get App