🔥 TRENDING Five convicted in 12-year-old Dholpur... સાબરકાંઠા જીલ્લાની દીકરીએ એશિયન પેરા ગ... आजमनगर में 60 प्रतिशत मतदाताओं ने मतदा... Mass Marriage Ceremony Of Over 76 Coup... सीवान में पटाखा निर्माण के दौरान विस्फ... 2 नवंबर की रैली को सफल बनाने में जुटी...
29 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Politics

उजनी धरणावर AI डेटा सेंटर विरोधात शेतकरी-मच्छीमारांचा एल्गार; रोहित पवारांचा शहा गावात लाईव्ह कॉल

✍️ Reporter: रीपोर्टर दिलीप नगरे 🗓 29 Oct 2026, 08:14 PM 👁 17
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

उजनी धरणावर AI डेटा सेंटर उभारण्याच्या प्रस्तावाविरोधात शेतकरी आणि मच्छीमारांनी आक्रमक पविष्य घेतले आहे. या निषेध सभात खासदार रोहित पवारांनी शहा गावातून लाईव्ह कॉलद्वारे भाग घेतल्याचे समजते.

उजनी धरणावरील AI डेटा सेंटर विरोधात एल्गार! शहा परिसरातील ग्रामस्थ, शेतकरी आणि मच्छीमार समाज आक्रमक

आमदार रोहितदादा पवार यांचे लाईव्ह संबोधन - AI डेटा सेंटर मुळे होणारे गंभीर परिणाम उघड

उजनी धरण परिसरात प्रस्तावित असलेल्या ए.आय. डेटा सेंटर, अणुऊर्जा प्रकल्प, ग्रीन हायड्रोजन प्रकल्प, बॅटरी प्रकल्प आणि सोलर एनर्जी प्रकल्पा विरोधात शेतकरी, मच्छीमार आणि धरणग्रस्तांनी आता आरपारची लढाई सुरू केली आहे.

या प्रकल्पांमुळे करमाळा, माढा, इंदापूर, कर्जत, दौंड तालुक्यातील आणि संपूर्ण भीमानदीकाठावरील वारकरी, शेतकरी, धरणग्रस्त आणि मच्छीमार बांधव उद्ध्वस्त होणार असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर आमदार रोहितदादा पवार यांनी लाईव्ह संबोधन करत या प्रकल्पांचे दुष्परिणाम समजावून सांगितले.

आमदार रोहितदादा पवार यांनी सांगितलेले AI डेटा सेंटर मुळे होणारे परिणाम:

१. पाण्याचा प्रचंड उपसा: एका AI डेटा सेंटरला थंड करण्यासाठी दररोज लाखो लिटर पाणी लागते. उजनीचे पाणी आधीच शेती आणि पिण्यासाठी अपुरे असताना, हे पाणी उद्योगाला दिल्यास शेती पूर्णपणे उध्वस्त होईल.
२. शेतकरी आणि मच्छीमारांवर उपासमारीची वेळ: उजनीच्या पाण्यावर लाखो हेक्टर शेती आणि हजारो मच्छीमार कुटुंबांचे पोट आहे. पाणी पातळी कमी झाल्यास मासेमारी बंद होईल आणि शहा, टेंभुर्णी, कुर्डुवाडीसह भीमा पट्ट्यातील शेती ओसाड पडेल.
३. जमिनीला आणि पर्यावरणाला धोका: अणुऊर्जा आणि ग्रीन हायड्रोजन सारख्या प्रकल्पांमुळे जमिनी नापीक होण्याची आणि विस्थापनाची भीती ग्रामस्थांमध्ये आहे.

याचाच निषेध करण्यासाठी भव्य रस्ता रोको आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

आंदोलनाचा तपशील:

कधी: शनिवार, दि. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता
कुठे: हिंगणगाव - रांजणी, उजनीच्या पुलावर
नेतृत्व: आमदार रोहितदादा पवार, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आ. नारायणआबा पाटील, मा. आ. संजयमामा शिंदे, शेतकरी नेते मा. खासदार राजू शेट्टी, किसान महासभेचे नेते अजित नवले, ह.भ.प. शामसुंदर सोन्नर महाराज (राष्ट्रीय अध्यक्ष, वारकरी विचार मंच), मा. मंत्री महादेवराव जानकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली.

या आंदोलनात शहा परिसरातील ग्रामस्थ, शेतकरी वर्ग व मच्छीमार समाजाने हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
उजनी वाचवा - शेतकरी, मच्छीमार वाचवा!
📲Get App