Education
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांची फी माफ करा; शिक्षणमंत्र्यांकडे जागर प्रतिष्ठानची मागणी
माजलगावमधून जागर प्रतिष्ठानने शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांची फी माफ करण्याची आणि दहावी-बारावीची परीक्षा फी परत करण्याची मागणी केली आहे.
माजलगाव: दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे. या पार्श्वभूमीवर, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची फी लवकरात लवकर माफ करावी, तसेच दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांकडून शाळा व महाविद्यालयांनी घेतलेली परीक्षा फी शासनाच्या निर्णयानुसार तातडीने परत करावी, अशी मागणी जागर प्रतिष्ठानचे शहर अध्यक्ष योगानंद दिपक गुंजकर यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.
शिक्षणमंत्र्यांशी दूरध्वनीवरून बोलताना गुंजकर यांनी विद्यार्थ्यांच्या विविध अडचणी शिक्षणमंत्र्यांसमोर मांडल्या. दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत असताना त्यांच्या मुला-मुलींना शिक्षणाच्या खर्चाचा अतिरिक्त भार सहन करावा लागत आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थितीअभावी कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी सरकारने तातडीने ठोस निर्णय घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा फीबाबत शासनाने घेतलेल्या निर्णयाची शाळा व महाविद्यालयांमध्ये लवकरात लवकर प्रभावी अंमलबजावणी करावी, विद्यार्थ्यांकडून आधीच घेतलेली फी तातडीने परत करावी आणि विद्यार्थ्यांना फीच्या कारणावरून कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, अशी मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवता कामा नये, असे गुंजकर यांनी म्हटले.
विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून शासनाने या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा जागर प्रतिष्ठानकडून व्यक्त करण्यात आली आहे.