🔥 ट्रेंडिंग देवास में जहरीली शराब कांड: इंदौर से आ... कल से मप्र में बादल छाएंगे, पूर्वी हिस... सीएम मोहन यादव ने भोपाल के ओरिएंटल कॉल... भोपाल के वीआईपी रोड पर आरजीपीवी की बस... मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव ने ग्रामीण क... त्योहारों को लेकर उरई में पुलिस की पैद...
27 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
स्थानीय

दीपावलीच्या पार्श्वभूमीवर किल्ल्यांच्या चित्रांना अंतिम कलाकुसरीचा साज! कुंभारवाड्यात वाघ, सिंह, मावळे, ससा यांसह विविध चित्रे व किल्ले साकारण्यात कलाकार व्यस्त

✍️ रिपोर्टर: किरण सदाशिव आंबिके 🗓 27 अक्टू. 2026, 08:10 PM 👁 43
यहाँ देखें: ▶️ YouTube 📘 Facebook 📷 Instagram
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
भोर : प्रतिनिधी
दीपावलीचा सण अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपल्याने लहान मुलांसह नागरिकांमध्ये दिवाळीची लगबग सुरू झाली आहे. दिवाळी म्हटले की लहान मुलांनी गड-किल्ले तयार करून त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जिवंत करण्याची परंपरा आजही मोठ्या उत्साहाने जपली जाते. या किल्ल्यांवर मांडण्यासाठी लागणाऱ्या विविध चित्रांना सध्या मोठी मागणी असून, ही चित्रे आकर्षक बनविण्यासाठी कलाकारांची लगबग सुरू आहे.
भोरमधील कुंभार वाड्यामध्ये सध्या किल्ल्यांवर मांडण्यात येणाऱ्या विविध चित्रांवर शेवटचा हात फिरवण्याचे काम वेगाने सुरू आहे. वाघ, सिंह, मावळे, ससा यांसह विविध प्रकारच्या चित्रांची कलाकुसर येथे केली जात आहे. प्रत्येक चित्र अधिक आकर्षक आणि वास्तवदर्शी दिसावे, यासाठी कलाकार बारकाईने मेहनत घेत आहेत.
दिवाळीच्या सुट्टीत मुलांना स्वतःचे किल्ले उभारण्याचा आनंद मिळतो. किल्ल्यांवर मांडले जाणारे मावळे, प्राणी आणि इतर आकर्षक प्रतिकृती यामुळे या किल्ल्यांचे सौंदर्य आणखी खुलते. या माध्यमातून मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, गड-किल्ल्यांचे महत्त्व आणि महाराष्ट्राच्या शौर्यपरंपरेची ओळखही होते.
सण जवळ आल्याने विविध आकारांतील आणि प्रकारांतील चित्रांची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, दिवाळीपूर्वी ही चित्रे खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. पारंपरिक किल्ले उभारण्याची संस्कृती जपताना या कलाकुसरीमुळे स्थानिक कलाकारांच्या कौशल्यालाही प्रोत्साहन मिळत आहे.
📲Get App