🔥 TRENDING ಸೂರ್ಯ-ನಸ್ಲೆನ್ ನಟಿಸಿದ 'ಸೀನ್' ಸಿನಿಮಾ ಮೊದ... Indore Markets Stay Open Until 2 AM on... ಅಜಯ್ ದೇವಗನ್ ಅಭಿನಯದ 'ದೃಶ್ಯಂ 3' 36 ದಿನಗಳ... ಕನ್ನಡ 'ರಾಮಾಯಣ' ಚಿತ್ರಕ್ಕೆ 53.8% ಥಿಯೇಟರ್... Gold Prices in Hyderabad on Nov 7: 22‑... ಕ್ರಿಸ್ಟಿಯಾನೋ ರೊನಾಲ್ಡೋ 23 ವರ್ಷಗಳ ಫುಟ್ಬಾ...
07 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

ठाण्याची वारी टळली! आमदार किसन कथोरेंचा मास्टरस्ट्रोक; कल्याणमध्ये अखेर 'अपर जिल्हाधिकारी कार्यालय' मंजूर!

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 07 Nov 2026, 03:15 PM 👁 33
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
ठाण्याची वारी टळली! आमदार किसन कथोरेंचा मास्टरस्ट्रोक; कल्याणमध्ये अखेर 'अपर जिल्हाधिकारी कार्यालय' मंजूर!
नीड २४ न्यूज महाराष्ट्र
जिल्हा प्रतिनिधी काशिनाथ देसले ठाणे
तालुका प्रतिनिधी किशोर पवार मुरबाड
७/११/२०२६
विशेष वृत्त :
विशेष प्रतिनिधी, मुरबाड ठाणे
कल्याण, उल्हासनगर, मुरबाड आणि अंबरनाथ या चार तालुक्यांतील लाखो नागरिकांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि ऐतिहासिक बातमी समोर आली आहे. जिल्हास्तरावरील विविध महसूल कामांसाठी आता या भागातील जनतेला दूरवर असलेल्या ठाणे जिल्हा मुख्यालयात जाण्याची कोणतीही गरज भासणार नाही. कारण, कल्याण येथे नवे अपर जिल्हाधिकारी कार्यालय कार्यान्वित करण्यास महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने अधिकृत मंजुरी दिली आहे.
मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार किसन कथोरे यांनी या कार्यालयासाठी शासनाकडे सातत्याने आणि आक्रमकपणे केलेल्या पाठपुराव्याला अखेर सुवर्ण यश आले आहे. ६ नोव्हेंबर रोजी महसूल विभागाने या निर्णयावर शिक्कामोर्तब केल्याने कार्य सम्राट आमदार किसनजी कथोरेंच्या प्रयत्नांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
नागरिकांची त्रासातून सुटका; वेळ अन् पैशांची होणार बचत
ठाणे जिल्ह्याचा झालेला अफाट भौगोलिक विस्तार, सातत्याने वाढणारी लोकसंख्या आणि झपाट्याने होणारे नागरीकरण यामुळे ठाणे जिल्हा कार्यालयावर कामाचा प्रचंड ताण येत होता. त्यातच कल्याण, मुरबाड, अंबरनाथ आणि उल्हासनगर या चार तालुक्यांतील नागरिकांना साध्या महसूल कामांसाठीही संपूर्ण दिवस खर्च करून ठाणे गाठावे लागत होते. ज्येष्ठ नागरिक, शेतकरी आणि सामान्य जनतेची होणारी ही मोठी गैरसोय आमदार किसन कथोरे यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिली होती.
"सामान्य जनतेचा त्रास कमी करणे हेच आमचे ध्येय" - आमदार किसन कथोरे
या ऐतिहासिक मंजुरीनंतर माध्यमांशी बोलताना आमदार किसन कथोरे म्हणाले, "कल्याण, मुरबाड, अंबरनाथ आणि उल्हासनगर भागातील नागरिकांना छोट्या-मोठ्या महसूल कामांसाठी ठाण्यापर्यंत चकरा माराव्या लागत होत्या, हे मी जवळून पाहिले आहे. सर्वसामान्यांचा हा त्रास आणि वेळ वाचवणे गरजेचे होते. म्हणूनच मी या कार्यालयासाठी शासनाकडे सातत्याने आग्रही मागणी केली होती. अखेर मुख्यमंत्र्यांनी आणि महसूल विभागाने याला मंजुरी दिली असून, हा आमच्या चारही तालुक्यांतील जनतेचा विजय आहे."
लवकरच होणार दिमाखदार उद्घाटन
शासकीय मंजुरी मिळाल्यानंतर आता कल्याण येथील या नव्या अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रशासकीय तयारीला वेग आला आहे. नागरिकांना तातडीने सेवा मिळावी म्हणून आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधा आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती युद्धपातळीवर केली जात असून, लवकरच एका भव्य कार्यक्रमात या कार्यालयाचे अधिकृत उद्घाटन करून ते जनतेच्या सेवेसाठी खुले केले जाणार आहे.
शासनाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे आणि आमदार किसन कथोरे यांच्या यशस्वी दूरदृष्टीमुळे संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून, विशेषतः चारही तालुक्यांतील नागरिकांमधून आणि लोकप्रतिनिधींमधून त्यांचे विशेष आभार मानले जात आहेत
📲Get App