🔥 TRENDING Four Men Shot Dead at Rohtak Dhaba; Po... Raipur Airport Upgrade to Permit Landi... CSPDCL Extends 2026 Recruitment Deadli... બાળ લગ્ન મુક્ત સમાજના નિર્માણ માટે નર્... Congress Consolidates Power in Boondi... HBSE Sets 2027 Exam Dates: Class‑10 Be...
26 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Religion

ठाणे-मुरबाड आणि कल्याण परिसरातील वारकऱ्यांची मांदळी तीर्थक्षेत्राला भेट; संजीवन समाधीचे दर्शन व महाप्रसादाचा लाभ

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 26 Nov 2026, 05:20 PM 👁 23
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले ठाणे, सहतालुका रिपोर्टर
किशोर पवार मुरबाड
दिनांक २६/११/२०२६.
मुरबाड / अहिल्यानगर, दि. २६ नोव्हेंबर २०२६ (प्रतिनिधी):
श्री क्षेत्र पंढरपूर येथून विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासात निघालेल्या ठाणे जिल्ह्यातील मुरबाड आणि कल्याण परिसरातील वारकऱ्यांच्या सहलीने गुरुवार, दिनांक २६ नोव्हेंबर २०२६ रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा व कर्जत तालुक्याच्या सीमेवरील मांदळी तीर्थक्षेत्राला सदिच्छा भेट दिली. यावेळी वारकऱ्यांनी श्री लालगीर स्वामी व बालयोगी आत्मारामगिरी महाराज यांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला.
मुरबाड व कल्याण तालुक्यातील नऊ गावांचा सहभाग
या वारकरी सहलीसाठी एसटी महामंडळाच्या कल्याण आगाराची विशेष बस (गाडी क्रमांक: MH 14 NP 1972) आरक्षित करण्यात आली होती. या सहलीत मुरबाड तालुक्यातील सरळगांव, सासणे, शील, किसळ, भालकेचा पाडा, पारतले, दहिवली, भादाणे आणि कल्याण तालुक्यातील बापगांव येथील ग्रामस्थ व वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मांदळीचा गौरवशाली आध्यात्मिक इतिहास
मांदळी येथील संजीवन समाधी मंदिर हे श्री लालगीर स्वामी आणि त्यांचे परंपरेतील शिष्य बालयोगी आत्मारामगिरी महाराज (आत्माराम बाबा) यांच्या तपश्चर्येने पावन झालेले जागृत देवस्थान आहे. मूळचे श्रीगोंदा तालुक्यातील हंगेवाडी येथील तुकाराम व हौसाबाई गाडिलकर यांचे सुपुत्र असलेले आत्माराम बाबा कामानिमित्त कुटुंबासोबत इंदूर येथे गेले होते. दरम्यान, मांदळी येथील लालगीर स्वामींच्या संजीवन समाधी मठाचे तत्कालीन मठाधिपती शंकरगिरी महाराज यांना मठाच्या सेवेसाठी एका बालशिष्याची आवश्यकता होती. त्यांनी बालवयातच आत्माराम बाबांना इंदूरहून मांदळी येथे आणून गिरी संप्रदायाची दीक्षा दिली. मांदळी व घोगरगाव येथे शिक्षण पूर्ण करत बालयोगी आत्मारामगिरी महाराजांनी येथे कठोर तपश्चर्या आणि अखंड भजन-कीर्तनाच्या माध्यमातून भक्तीचा मळा फुलवला.
भजन-कीर्तन आणि महाप्रसादाचा लाभ
पंढरपूरहून परतताना मांदळी येथे पोहोचलेल्या या वारकऱ्यांनी संजीवन समाधीचे दर्शन घेतल्यानंतर मंदिरात भजन-कीर्तन केले. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि 'ज्ञानोबा-माऊली-तुकाराम' तसेच 'आत्माराम बाबा की जय' अशा जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. देवस्थानच्या वतीने सर्व वारकऱ्यांचे स्वागत करून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
या संपूर्ण वारकरी सहलीचे उत्कृष्ट नियोजन आयोजक विठ्ठल देशमुख आणि जिल्हा पत्रकार काशिनाथ देसले यांनी केले असून, या उपक्रमासाठी बडगुजर यांनीही मोलाचे सहकार्य केले. तसेच एसटी महामंडळाचे चालक महेश शिवाजी तांदळे, वाहक किशोर साहेबराव चव्हाण, कल्याण आगार व्यवस्थापक देवदार साहेब आणि वाहतूक नियंत्रक शिर्के साहेब यांनी सहलीसाठी उत्तम नियोजन करून वारकऱ्यांना सुरक्षित व सुखकर सेवा दिल्याबद्दल सर्व भाविकांच्या वतीने त्यांचे शब्दसुमनांनी विशेष आभार मानण्यात आले.
📲Get App