🔥 TRENDING Saif Ali Khan Unveils Heritage Slipper... Former England Cricketer Kevin Pieters... Anupam Kher Debunks Rs 500 Cr Net Wort... Padmaavat Faces Historical Backlash: C... Bihar BPSC Announces 72nd Pre New Exam... Vaishali Admin Issues Traffic Advisory...
20 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Politics

ठाणे जिल्ह्याला दुष्काळाच्या यादीतून वगळले; मुरबाड, शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र निराशा.

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 19 Nov 2026, 09:52 PM 👁 76
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
ठाणे जिल्ह्याला दुष्काळाच्या यादीतून वगळले; मुरबाड, शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र निराशा
शेजारील पालघर जिल्ह्यातील तालुक्यांचा समावेश, मात्र ठाणे जिल्ह्यावर अन्याय झाल्याची बळीराजाची भावना
जिल्हा प्रतिनिधी काशिनाथ देसले ठाणे सह
तालुका प्रतिनिधी किशोर पवार मुरबाड.
विशेष दुष्काळ मागणी वार्ता पत्र
मुरबाड / ठाणे :दिनांक २०/११/२०२६.
राज्य शासनाने यापूर्वी जाहीर केलेल्या ३०४ दुष्काळी तालुक्यांव्यतिरिक्त राज्यातील आणखी ६ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या ३१० वर पोहोचली आहे. मात्र, या सुधारित यादीतूनही ठाणे जिल्ह्याला पूर्णपणे वगळण्यात आल्याने जिल्ह्यातील कृषीप्रधान असलेल्या मुरबाड आणि शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र निराशा पसरली आहे.
शासनाच्या नव्या निर्णयानुसार नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, रत्नागिरीतील चिपळूण, कोल्हापूरमधील हातकणंगले व गडहिंग्लज तसेच ठाणे जिल्ह्याला लागून असलेल्या पालघर जिल्ह्यातील वाडा आणि विक्रमगड या तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यात आला आहे. शेजारील पालघर जिल्ह्यातील वाडा आणि विक्रमगड या तालुक्यांना दुष्काळी सवलतींचा लाभ मिळणार असताना, सारखीच भौगोलिक परिस्थिती आणि शेतीचे नुकसान सोसणाऱ्या मुरबाड व शहापूर तालुक्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याची भावना स्थानिक शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
दुष्काळग्रस्त घोषित झालेल्या ३१० तालुक्यांमध्ये शासनाकडून विविध सवलती लागू करण्यात आल्या आहेत. यामध्ये जमीन महसुलात सूट, पीककर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, ७.५ हॉर्सपावरपेक्षा जास्त क्षमतेच्या कृषी पंपांच्या चालू वीजबिलात सवलत, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी आणि रोहयो (MGNREGA) अंतर्गत कामांच्या निकषांत शिथिलता अशा महत्त्वाच्या उपाययोजनांचा समावेश आहे.
ठाणे जिल्ह्याचा समावेश नसल्याने मुरबाड आणि शहापूर तालुक्यातील हजारो शेतकरी आणि विद्यार्थी या सर्व शासकीय सवलतींपासून वंचित राहणार आहेत. आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना या निर्णयामुळे मोठा धक्का बसला आहे. राज्य शासनाने या निर्णयाचा फेरविचार करून मुरबाड आणि शहापूर तालुक्यांचा तातडीने दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा, अशी जोरदार मागणी स्थानिक शेतकरी व शेतकरी संघटनांकडून केली जात आहे.
माननीय आमदार किसन जी कथोरे साहेब यांनी मुरबाड तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या वतीने दुष्काळ जाहीर करावा या साठी मुख्य मंत्री यांच्या कडे सविस्तर निवेदन दिलेले असताना देखील दुष्काळ जाहीर करण्यात आलेला नाही. ही खेदाची बाब
आहे, शासनाने आता तरी शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. आमदार
किसनजी कथोरे साहेबांची मागणी रास्त आहे व ती मागणी मान्य करावी.
📲Get App