🔥 TRENDING 5ನೇ ವಾರ್ಡಿನ ಸಮಸ್ಯೆಗಳ ಪರಿಹಾರಕ್ಕೆ ಕರ್ನಾಟ... प्रतापगढ़ के नायन पंचायत में 35 साल बा... સાબરકાંઠા: રાણી તળાવ વિકાસમાં ગુણવત્તા... ग्राम पंचायत बिलारी में 'बाल विवाह मुक... સાબરકાંઠા માં રાણી તળાવ વિકાસમાં પંચાય... MK Stalin Skips Sonia Gandhi Book Laun...
18 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Crime

दुबई कनेक्शन असलेल्या आंतरराष्ट्रीय सायबर रॅकेटचा पर्दाफाश; सात जणांना अटक!

✍️ Reporter: Anil Mallav 🗓 18 Nov 2026, 09:32 PM 👁 9
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

सायबर गुन्ह्यांसाठी तब्बल १० ते १२ हजार भारतीय सिमकार्ड पुरविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

दुबई कनेक्शन असलेल्या आंतरराष्ट्रीय सायबर रॅकेटचा पर्दाफाश; सात जणांना अटक!

पुणे जिल्हा प्रतिनिधी : १८ नोव्हेंबर २०२६

दुबईतून चालणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक रॅकेटला पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी मोठा धक्का दिला आहे. सायबर गुन्ह्यांसाठी तब्बल १० ते १२ हजार भारतीय सिमकार्ड पुरविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. तपासात दुबई कनेक्शन आणि मुंबईतील सिमकार्ड विक्रेत्यांचे जाळे उघडकीस आले आहे.

निगडीतील सुमंत ऊर्फ नानू दसरे याला दुबईहून भारतात आणल्यानंतर चौकशीत या रॅकेटची माहिती समोर आली. तुषार चौधरी, आदर्श वाघमारे यांच्यासह मनिष वाधवा, महेश चौथरामानी, सूरज चिकवा आणि राजा कुमार यांना अटक करण्यात आली आहे.

आरोपी मुंबईतील रस्त्यांवर छत्री लावून सिमकार्ड विक्री करीत होते. ही सिमकार्ड सायबर फसवणुकीसाठी वापरली जात असल्याचे तपासात उघड झाले आहे. या आंतरराष्ट्रीय रॅकेटमागील इतर आरोपींचा शोध पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांकडून सुरू आहे.
📲Get App