🔥 ट्रेंडिंग दीवाली पर असम में 11 आग, 3 घायल, घर-गो... आईआईएफए ने उषा उथप को समर्पित किया उनक... नई तिहार गीतों पर आलोचना, मौलिकता की क... बीडीपी ने राहुल खर्जे पर दिवाली टिप्पण... 6 वर्ष के उडुपी के बच्चे ने कर्नाटक स्... आरपीएससी भर्ती: मॉडल उत्तर कुंजी पर आप...
09 नव. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
दाभोळे परिसरात लहरी हवामानामुळे आरोग्य धोक्यात, आजारांचे प्रमाण वाढले
स्वास्थ्य

दाभोळे परिसरात लहरी हवामानामुळे आरोग्य धोक्यात, आजारांचे प्रमाण वाढले

✍️ रिपोर्टर: Dr.Aniket Mestri 🗓 23 सित. 2026, 04:05 PM 👁 93
यहाँ देखें: ▶️ YouTube
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

अनियमित पाऊस आणि अचानक बदलणाऱ्या हवामानाचा दाभोळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून, सर्दी, ताप, खोकला यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढले आहे.

दाभोळे आणि आजुबाजूच्या परिसरात अनियमित पाऊस आणि अचानक बदलणाऱ्या हवामानाचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. हवामानातील सततच्या बदलांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून परिसरात विविध आजारांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे.

सध्या या भागात पावसाचा कोणताही निश्चित अंदाज नाही. अवकाळी पावसामुळे तापमानात मोठी वाढ झाली आहे. काही दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार होऊन अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत, ज्यामुळे वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. सकाळी वातावरण उष्ण असते, तर दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार होते.

या अनियमित हवामानाचा लहान मुले आणि वृद्धांवर मोठा परिणाम जाणवत आहे. हवामानाशी जुळवून घेणे मानवी शरीरासाठी अत्यंत कठीण झाले आहे. हवामानातील सातत्यपूर्ण बदलांमुळे परिसरात सर्दी, ताप, खोकला, घसा खवखवणे आणि व्हायरल इन्फेक्शनच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ दिसून येत आहे. तसेच, अंगदुखी आणि अशक्तपणा जाणवण्याची समस्याही नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

बदलत्या वातावरणात प्रकृती सुदृढ ठेवण्यासाठी नागरिकांनी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. पिण्याचे पाणी नेहमी उकळून प्यावे आणि बाहेरचे अन्नपदार्थ टाळावेत. प्रकृतीत थोडा जरी बिघाड जाणवल्यास घरगुती उपचार न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
📲Get App