🔥 ट्रेंडिंग गुढ़ में 6.06 करोड़ की लागत से बनेगी त... रोबोशाला कार्यक्रम का उच्चतर माध्यमिक... जयशंकर रामलीला समिति ने उन्नाव के सोहो... बांसवाड़ा में पंचायती राज चुनाव के द्व... भगवान वाल्मीकि महाराज का प्रकट दिवस धू... खेत बचाओ अभियान में हरिद्वार के किसानो...
27 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
टेक्नोलॉजी

टाटा पॉवर हाऊस विज प्रकल्प बदलापूर येथे मा कार्य सम्राट आमदार श्री किसनजी कथोरे त्यांच्या हस्ते भूमी पूजन.

✍️ रिपोर्टर: Kashinath Desale 🗓 27 अक्टू. 2026, 03:31 PM 👁 18
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
टाटा पॉवर हाऊस विज प्रकल्प बदलापूर येथे मा कार्य सम्राट आमदार श्री किसनजी कथोरे त्यांच्या हस्ते भूमी पूजन
बदलापूर, ठाणे विशेष वृत्त नीड २४न्यूज महाराष्ट्र
दिनांक २७/१०/२०२६.
जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले ठाणे.
तालुका रिपोर्टर किशोर पवार मुरबाड
ठाणे : बदलापूर शहर आणि परिसरातील वाढत्या लोकसंख्येमुळे तसेच झपाट्याने होत असलेल्या निवासी व व्यावसायिक विकासामुळे वीजमागणीत मोठी वाढ झाली आहे. परिणामी, वीजपुरवठा व्यवस्थेवर वाढलेला ताण आणि भार व्यवस्थापनामुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन या समस्येवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत होते. या प्रयत्नांना आज महत्त्वपूर्ण यश मिळाले असून, बदलापूरमध्ये टाटा पॉवर प्रकल्पाचे भूमिपूजन आमदार किसन जी कथोरे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले..
मुंबईनंतर पहिल्यांदाच बदलापूरमध्ये साकारण्यात येणारा हा प्रकल्प शहराच्या वीजपुरवठा व्यवस्थेला अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या प्रकल्पांतर्गत रमेशवाडी ते जोवेली गाव परिसरातील कोंडेश्वर रोड येथे उपकेंद्र उभारण्यासह २२० केव्ही क्षमतेची भूमिगत केबल टाकण्यात येणार आहे. या प्रस्तावित प्रकल्पामुळे विद्युत परिवर्तन क्षमतेत १८० MVA ने वाढ होणार असून, बदलापूर आणि परिसरातील वाढत्या वीजमागणीची पूर्तता करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत.
बदलापूर परिसरात मेट्रो प्रकल्प, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (NHAI) प्रकल्प तसेच वाढत्या निवासी आणि व्यावसायिक विकासामुळे भविष्यात विजेची मागणी आणखी वाढणार आहे. ही वाढती गरज लक्षात घेऊन सक्षम वीजपुरवठा व्यवस्था उभारणे अत्यावश्यक होते. टाटा पॉवरच्या या प्रकल्पामुळे वीजपुरवठा व्यवस्थेची क्षमता वाढण्यासोबतच महावितरणच्या जुन्या उपकेंद्रांवरील भार कमी करण्यास मदत होणार आहे. त्यामुळे भार व्यवस्थापनामुळे नागरिकांना सहन कराव्या लागणाऱ्या अडचणी कमी करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरेल.
बदलापूर शहराचा नियोजनबद्ध विकास साधताना नागरिकांना मूलभूत सुविधा सक्षम स्वरूपात उपलब्ध करून देणे ही प्राथमिकता आहे. वाढत्या शहरीकरणाला पूरक पायाभूत सुविधा निर्माण करणे आणि भविष्यातील गरजांचा विचार करून विकासकामांचे नियोजन करणे आवश्यक आहे. टाटा पॉवर प्रकल्पाच्या माध्यमातून बदलापूरच्या वीजपुरवठा व्यवस्थेला बळकटी मिळणार असून, शहराच्या आगामी विकासासाठीही त्याचा सकारात्मक उपयोग होईल.
बदलापूरकरांना अधिक सक्षम आणि विश्वासार्ह वीजपुरवठा उपलब्ध व्हावा, यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांमधील हा महत्त्वाचा टप्पा आहे. बदलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार आहे.या कर्यक्रमा साठी बदलापूर शहर प्रतिष्टीत कार्य कर्ते, टाटा पॉवर चे अधिकारी बदलापूर पालिकेचे
नगराध्येक्ष नगर सेवक वॉर्ड कार्य कर्ते प्रतिष्टीत नागरिक व अंबरनाथ तालूका महसूल अधिकारी यांनी हजेरी लावली.
या प्रकल्प साठी अथक प्रयत्न मा आमदार किसनजी कथोरे यांनी केल्याने सर्वत्र अभिनंदन केले.त्यांना बदलापूर करानी धन्यवाद दिले.


#स्वप्नपूर्ती #बदलापूर #TataPower #kisankathore #bjp4maharashtra
📲Get App