🔥 TRENDING मुरबाड तालुक्यातील मासले बेलपाडा महिला... कीमो पॉल के 'पंजे' में फंसी टीम इंडिया... રાજપારડીમાં નવરાત્રીના ચોથા દિવસે અલકા... હિંમતનગરમાં જાહેરમાં બે જંગલી આખલાઓ વચ... सरयू नदी का विकराल कटाव: 17 ठोकर भी बे... राघोपुर नाव हादसे के बाद स्वास्थ्य मंत...
14 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

शिंद गावात नवरात्रोत्सवानिमित्त शिवप्रतिष्ठानकडून दुर्गामाता दौडचे आयोजन

✍️ Reporter: किरण सदाशिव आंबिके 🗓 14 Oct 2026, 09:50 PM 👁 18
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

पुण्याच्या भोर तालुक्यातील वीररत्न बाजीप्रभु देशपांडे यांच्या जन्मभूमी असलेल्या शिंद गावात, नवरात्र उत्सवानिमित्त शिवप्रतिष्ठानकडून दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात आले. या दौडीत लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

पुण्याच्या भोर तालुक्यातील वीररत्न बाजीप्रभु देशपांडे यांची जन्मभूमी असलेल्या शिंद गावात, नवरात्र उत्सवानिमित्त शिवप्रतिष्ठानकडून दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात आले आहे. गावातील वीररत्न बाजीप्रभू यांच्या पुतळ्याला वंदन करून, नवरात्र उत्सवाच्या दरम्यान पहाटे काढण्यात आलेल्या या दौडीमध्ये लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील गावागावात दुर्गामाता दौडचा आवाज घुमू लागला आहे. शिवाजी महाराजांचा जयघोष करत, पोवाडा, देशभक्तीपर गीते आणि दुर्गा देवीची गीते म्हणत, धर्मजागरण करत चिमुकल्यांसह मोठ्या संख्येने तरुण वर्ग या दौडीत सहभागी होत आहेत.

दरवर्षी घटस्थापनेपासून ते दसऱ्यापर्यंत, शारदीय नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांमध्ये पहाटे दुर्गामाता दौडीचे आयोजन केले जाते. या दौडीची सांगता दसऱ्याच्या दिवशी होते.
📲Get App