🔥 TRENDING Bhavnagar Court Delivers Swift Verdict... Batra Calls for Increased Night Patrol... Bharat RE Summit Positions India as Cr... India‑Colombia Urge Shift from Trade t... Democrats to Challenge Trump's Tariff... Maira Rejects Nakul's Proposal in Late...
06 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Politics

शेतकऱ्याच्या घरावर वन विभागाचा बुलडोझर; मुरबाडमधील अमानुष कारवाईमुळे नागरिकांचा तीव्र संताप.

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 27 Oct 2026, 12:30 PM 👁 84
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
शेतकऱ्याच्या घरावर वन विभागाचा बुलडोझर; मुरबाडमधील अमानुष कारवाईमुळे नागरिकांचा तीव्र संताप.
नीड २४ न्यूज महाराष्ट्र.
विशेष वार्ता, मुरबाड (ठाणे).
दिनांक: २७/१०/२०२६.
जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले ठाणे.
तालुका रिपोर्टर किशोर पवार मुरबाड.
मुरबाड: तालुक्यातील शाई गावातून वन विभागाच्या मनमानी आणि अमानुष कारभाराची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एक स्थानिक शेतकरी अनंत दळू भोईर यांच्या राहत्या घरावर वन विभागाने अचानक बुलडोझर चालवून ते घर जमीनदोस्त केले आहे. या धक्कादायक कारवाईमुळे संपूर्ण मुरबाड तालुक्यात नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात असून, दोषींवर कारवाईसाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शाई गावातील अनंत भोईर यांच्या घरावर वन विभागाने अचानक पोलीस संरक्षणात ही कारवाई केली. सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई करताना वन विभागाने मानवी हक्क आणि नैसर्गिक न्यायाचे पूर्णपणे उल्लंघन केले आहे. या संदर्भात उपवनसंरक्षक तुषार काळभोर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा मोबाईल बंद येत होता.
दोन महिन्यांच्या बाळासह मातेला जबरदस्तीने काढले घराबाहेर
या कारवाईदरम्यान वन विभागाचा अत्यंत निर्दयी चेहरा समोर आला आहे. ज्यावेळी घरावरील कारवाई सुरू होती, तेव्हा घरामध्ये एका दोन महिन्यांच्या निष्पाप बाळाला त्याची आई दूध पाजत होती. अशा अत्यंत संवेदनशील परिस्थितीतही वन कर्मचाऱ्यांनी कोणतीही सहानुभूती न दाखवता, त्या मातेला आणि तिच्या बाळासह संपूर्ण कुटुंबाला जबरदस्तीने घराबाहेर काढल्याची गंभीर तक्रार पीडित कुटुंबाने केली आहे.
कुटुंब आले उघड्यावर; न्यायाची मागणी
या अचानक झालेल्या कारवाईमुळे भोईर कुटुंबाच्या जीवनावश्यक वस्तूंचे प्रचंड नुकसान झाले असून, हे कुटुंब सध्या उघड्यावर आले आहे. याप्रकरणी संतप्त नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी मुरबाडच्या तहसीलदारांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे.
निवेदनातील प्रमुख मागण्या:
• पीडित भोईर कुटुंबासाठी तातडीने पर्यायी निवासाची व्यवस्था करण्यात यावी.
• झालेल्या सर्व नुकसानीची तात्काळ शासकीय भरपाई देण्यात यावी.
• पाडलेल्या घराच्या जागेची वन विभाग आणि भूमी अभिलेख विभागामार्फत संयुक्त मोजणी करण्यात यावी.
• या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी वन कर्मचाऱ्यांवर व अधिकाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
📲Get App