🔥 TRENDING Kapil Sharma Discusses CEC Impeachment... Husband Takes Own Life After Wife Hang... चेतगंज पुलिस ने गुमशुदा बालिका को सुरक... କାଳିମେଳା ଆଦିବାସୀ କଲୋନୀରେ ବିଧାୟକ ପାଣ୍ଠି... Rajasthan raises DA by 3% to 63% effec... মা দুর্গা প্রতিমা নিরঞ্জন কে কেন্দ্র ক...
30 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

श्री.स्वामी समर्थ रुग्णालयात दिव्यांग मुलांसाठी मोफत होमिओपॅथीक शिबिराचे आयोजन.

✍️ Reporter: Yallappa Rayagond Ragate 🗓 30 Oct 2026, 10:15 PM 👁 11
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
श्री.स्वामी समर्थ रुग्णालयात दिव्यांग मुलांसाठी मोफत होमिओपॅथीक शिबिराचे आयोजन.

चेअरमन महेश मालक इंगळे यांचे आवाहन.

(श्रीशैल गवंडी, अ.कोट, दि.३०/१०/२६)
येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान संचालित मैंदर्गी रोड वरील श्री स्वामी समर्थ रुग्णालयात मुंबई येथील
डॉ.प्रफुल्ल विजयकर होमिओपॅथिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन अणि वटवृक्ष देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने
दिनांक ०१ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश मालक इंगळे यांनी दिली.
होप फॉर द होपलेस' या उपक्रमांतर्गत
आशेचा किरण ठरलेल्या दिव्यांग मुलांसाठी नेहमी प्रमाणे या मोफत होमिओपॅथिक शिबिराचे आयोजन करण्यात आले असून डॉ.अम्बरीश विजयकर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे. सदरहू शिबिर दिनांक ०१ नोव्हेंबर वार रविवार रोजी सकाळी ८.०० ते दुपारी १२.०० या वेळेत श्री स्वामी समर्थ रुग्णालय भक्त निवास समोर, गाणगापूर रोड, अक्कलकोट संपन्न होईल.
यासंदर्भात मनोगत व्यक्त करताना देवस्थानचे चेअरमन महेश मालक इंगळे म्हणाले की श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे केवळ दर्शनापुरते मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकी जपत आहे. डॉ.प्रफुल्ल विजयकर साहेब आणि
डॉ.अम्बरीश विजयकर यांचे कार्य हे खरोखरच ईश्वरीय कार्य आहे. ज्या मुलांना समाज दिव्यांग म्हणतो, त्या मुलांमध्ये दिव्यत्व आणण्याचे काम ही टीम करते. अनेक वर्षांपासून हे शिबिर अक्कलकोटमध्ये होत आहे आणि शेकडो मुलांना याचा फायदा झाला आहे. यावर्षीही १ नोव्हेंबर रोजी हे शिबिर आपल्या स्वामी समर्थ हॉस्पिटलमध्ये होत आहे. मी सर्व गरजू पालकांना विनंती करतो की, आपल्या दिव्यांग मुलांना घेऊन या शिबिरात नक्की या. उपचार पूर्णपणे मोफत आहेत. स्वामी सेवा आणि मानव सेवा हाच आमचा उद्देश आहे. देवस्थानच्या वतीने या कार्याला सर्वतोपरी सहकार्य राहील. या शिबिरात दिव्यांग मुलांवर प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथी पद्धतीने मोफत उपचार व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी गरजूंनी 7039160039 / 7499788400 वर संपर्क साधावा असे आवाहनही चेअरमन महेश मालक इंगळे यांनी केले आहे.
📲Get App