🔥 TRENDING ਬੂਥਗੜ੍ਹ ਦੇ ਬਾਹਰੀ ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਹਾਈਵੇ ਦੇ ਕ... नवादा के कादिरगंज में प्रतिमा विसर्जन... Grand Procession Marks Sharada Mahotsa... Golden Chariot luxury train to resume... Rajasthan to Host First-Ever Cricket T... Rajasthan Woman Rejects 9-to-5 Routine...
23 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Sports

शिरपूरच्या आरव (कृष्णा) बिडकरची महाराष्ट्र क्रिकेट स्पर्धेसाठी निवड!

✍️ Reporter: Dhananjay Aradhye 🗓 23 Oct 2026, 01:24 AM 👁 23
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

शिरपूरच्या युवा क्रिकेटपटूचा डंका!

आरव (कृष्णा) बिडकरची महाराष्ट्र क्रिकेट स्पर्धेसाठी निवड!

धुळे जिल्ह्यातील १४ वर्षांखालील क्रिकेट संघात मिळवले स्थान; सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

शिरपूर : तालुका क्रिकेट असोसिएशन क्रिकेट क्लबचा युवा क्रिकेटपटू आरव ऊर्फ कृष्णा दीपक बिडकर याने आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर धुळे जिल्ह्याच्या १४ वर्षांखालील क्रिकेट संघात स्थान मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, पुणे यांच्या वतीने आयोजित निमंत्रित क्रिकेट स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे.

आरव हा आर. सी. पटेल शैक्षणिक संस्था संचलित एम. आर. पटेल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता सातवीत शिक्षण घेत आहे. तो तालुका क्रिकेट असोसिएशनच्या STCA क्रिकेट क्लबमध्ये नियमित सराव करतो. सातत्यपूर्ण मेहनत, जिद्द, चिकाटी आणि खेळातील कौशल्याच्या बळावर त्याने धुळे जिल्ह्यातील निवडक १५ खेळाडूंमध्ये स्थान मिळवले आहे.

क्रिडाप्रमुख फिरोज शेख, संजय जगताप, आनंद जगताप, संदीप देशमुख, राकेश बोरसे, भावेश शर्मा आणि चेतन राजपूत यांचे त्याला मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आरवने आपल्या खेळात सातत्याने सुधारणा केली असून, या निवडीमुळे त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला नवी दिशा मिळाली आहे.

या यशाबद्दल जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष भूपेशभाई पटेल, विशेष सल्लागार राजवर्धन कदमबांडे, सचिव प्रितेश पटेल तसेच प्राचार्य यांनी आरवचे अभिनंदन केले. संस्थेतील सर्व व्यवस्थापक, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी आणि पालकांनीही त्याचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

आरवच्या या यशामुळे त्याच्या कुटुंबीयांसह शाळा आणि क्रिकेट क्लबमध्ये आनंदाचे वातावरण असून, भविष्यात राज्यस्तरावरही तो चमकदार कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
📲Get App