🔥 ट्रेंडिंग ਹਾਈ ਕੋਰਟ ਦਾ ਵੱਡਾ ਫ਼ੈਸਲਾ : 21 ਸਾਲ ਇਕੱਠੇ... गया के जनकपुर वार्ड 50 में मनपुर देवी... બોરસદ કોલેજ ગ્રાઉન્ડમાં નવરાત્રી મહોત્... तेज गति वाली कार ने बलरामपुर के कोतवाल... తెలంగాణ ప్రజలకు సద్దుల బతుకమ్మకు శుభాక... चेनई में भारी बारिश: पूर्वोत्तर मानसून...
18 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
स्थानीय

श्रीमती रामप्यारीबाई चांडक लोणी विद्यालयात वाचन प्रेरणादिनानिमित्त व्याख्यान वाचनाचे महत्त्व, मोबाईलचे दुष्परिणाम आणि ध्येयसिद्धीसाठी प्रयत्नाचे मार्गदर्शन

✍️ रिपोर्टर: अंकुश सुधाकरराव कापसे 🗓 18 अक्टू. 2026, 11:52 AM 👁 41
यहाँ देखें: ▶️ YouTube
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
शिक्षण प्रसारक मंडळ लोणीद्वारा संचालित श्रीमती रामप्यारीबाई चांडक विद्यालय, लोणी येथे भारताचे माजी राष्ट्रपती व महान शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणादिन साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. व्ही. खोडे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा शिक्षक संजय एस. बहुरूपी यांनी केले.
प्रमुख वक्ते म्हणून रोजगार संघ, नागपूरचे संस्थापक अध्यक्ष प्रा. संजयजी नाथे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व, मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम, दुष्काळजन्य परिस्थितीत पाणी बचतीची गरज, ध्येयसिद्धीसाठी योग्य नियोजन व कठोर परिश्रम तसेच व्यक्तिमत्त्व विकास या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र विद्यालय, खापरखेडा येथील उपमुख्याध्यापक प्रमोद इंखे उपस्थित होते. त्यांनी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त विद्यालयाच्या वाचनालयाला पुस्तके भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच माजी गटविकास अधिकारी उद्धव साबळे यांनीही विद्यार्थ्यांना समयोचित मार्गदर्शन केले.
यावेळी विद्यालयाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक शिक्षक डी. पी. खोडे यांनी केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. व्ही. खोडे यांनी सर्व मान्यवर व सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पर्यवेक्षक व्ही. एच. चिमोटे तसेच सर्व शिक्षकवृंदांनी परिश्रम घेतले.
📲Get App