🔥 TRENDING ਦਿਲਜੀਤ ਦੇ ਦਿੱਲੀ ਸ਼ੋਅ ਨੂੰ ਲੈ ਕੇ ਆਈ ਵੱਡੀ... Man Scales Mobile Tower at Midnight in... Rajasthan Woman Who Skipped 9‑to‑5 Job... "ਮੈਂ ਭੀਖ ਨਹੀਂ ਮੰਗ ਰਹੀ..!" ਆਰਥਿਕ ਤੰਗੀ ਦ... Daytime Heat Persists in Jaipur with D... Firing at Durga Puja Fair in Nima, Bih...
22 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Religion

श्री संत सद्गुरू बाळूमामा मंदिर, शहा येथे शिखर कळस स्थापना सोहळा उत्सवाने संपन्न

✍️ Reporter: रीपोर्टर दिलीप नगरे 🗓 22 Oct 2026, 02:22 PM 👁 34
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

श्री संत सद्गुरू बाळूमामा मंदिर, शहा येथे शिखर कळस स्थापना सोहळा मोठ्या उत्साहाने पार पाडला गेला, ज्यात स्थानिक भक्त आणि धार्मिक नेते सहभागी झाले.

शहा (ता. इंदापूर) -22 ऑक्टोबर 2026 इंदापूर तालुक्यातील जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या श्री संत सद्गुरू बाळूमामा मंदिर, शहा येथे आज दिनांक 22 ऑक्टोबर 2026 रोजी मंदिराच्या शिखरावरील कळसाची स्थापना विधीवत पूजा करून करण्यात आली.

यावेळी पंढरपूर येथील ब्राह्मण काका गुरुजी यांच्या हस्ते शास्त्रोक्त पद्धतीने विधी करण्यात आला. या पवित्र सोहळ्यासाठी बाळूमामा भक्त आणि सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहा येथील बाळूमामा मंदिर हे इंदापूर तालुक्यातील एक जागृत दरबार म्हणून प्रसिद्ध आहे. येथे दर रविवारी हजारो भाविक भक्त दर्शनासाठी येतात. आरती आणि महाप्रसादाचा भाविक मोठ्या भक्तीभावाने लाभ घेतात. विशेषतः रविवारचा महाप्रसाद हा मोठ्या भक्तीभावाने संपन्न होतो.

बाळूमामा हे जगाचे मालक, विश्वकर्ता आहेत, अशी भाविकांची दृढ श्रद्धा आहे. दुःख घेऊन आलेला प्रत्येक भाविक मामांच्या दरबारातून सुखी होऊन जातो. आजच्या कळस स्थापना सोहळ्यामुळे मंदिराच्या वैभवात आणखी भर पडली असून परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
बाळूमामाच्या नावानं चांगभलं!
📲Get App