स्थानीय
श्री कुलस्वामी पतसंस्था पिंपरी पेंढार या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
यहाँ देखें:
▶️ YouTube
श्री कुलस्वामी पतसंस्था पिंपरी पेंढार या संस्थेची १९वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार गावांमधील अग्रस्थानी असलेली पतसंस्था श्री कुलस्वामी दुध उत्पादकांची ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था पिंपरी पेंढार या संस्थेची १९वी वार्षिक सर्वसाधारण संपन्न झाली. सर्वप्रथम गणेशाचे पूजन झालं त्यानंतर मागील वर्षी जे दिवंगत सभासद किंवा राजकीय नेते यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अध्यक्षांची निवड झाली संस्थेची चेअरमन श्री सुदामशेठ जोरी यांची सभेच्या अध्यक्षस्थान निवड झाली. मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. गावातील श्री सद्गुरू सिताराम महाराज विद्यालयातील खेळाडूंना टी-शर्ट पॅन्ट संस्थेच्या वतीने देण्यात आले आदर्श शिक्षकांचा सन्मान करण्यात आला व संस्थेचे वार्षिक अहवाल वाचण्यात आला संस्थेची व्यवस्थापक श्री तुषार जोरी यांनी अहवालाचे वाचन केले. अनेक विषयांवर चर्चा झाली त्यामध्ये सभासदांचा लाभांश तसेच दिवाळी भेटवस्तू याबाबत चर्चा झाली चर्चा करून योग्य तो लाभांश आणि दिवाळी भेटवस्तू दिली जाईल असे संस्थेचे चेअरमन श्री सुदामशेठ जोरी यांनी जाहीर केलं . ऐन वेळेच्या विषयांमध्ये कुठलाही विषय न आल्यामुळे आलेल्या सभासदांचे व मान्यवरांचा संस्थेचे चेअरमन श्री सुदामशेठ जोरी आभार मानले व सर्व सभासदांनासाठी स्नेहभोजन ठेवले होते त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा अशी विनंती करण्यात आली अशा प्रकारे खेळीमेळीच्या वातावरणात संस्थेची १९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली.