धर्म
श्री चारंगबाबा मित्र मंडळाचा देखावा ठरतोय लक्षवेधी.
यहाँ देखें:
▶️ YouTube
पिंपरी पेंढार मधील श्रीचारंगबाबा मित्र मंडळचा गणेशोत्सवानिमित्त देखावा ठरला लक्षवेधी
जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार गावांमधील श्री चारंग बाबा मित्र मंडळ दुरगुडे पट येथील गणेश उत्सवानिमित्त देखावा ठरला लक्षवेधी. मंडळ नेहमीप्रमाणे वेगवेगळे देखावे करत असते यावर्षी मंडळांनी नाशिक पुणे सरळ रेल्वे मार्ग व्हावा यासाठी एक मॉडेल बनवला आहे त्याचे सादरीकरण त्यांनी या गणेशोत्सवात केले आहे काही दिवसापूर्वी नाशिक पुणे रेल्वे सर्व मार्गाने व्हावी यासाठी आंदोलन झाली. त्याच पार्श्वभूमीवर रेल्वे मार्ग हा सरळ व्हावा त्यासाठी पुणे व नाशिक जिल्ह्यातील गावे त्यामध्ये नाशिक सिन्नर आळेफाटा नारायणगाव मंचर चाकण भोसरी या ठिकाणी आंदोलन झाली होती याची दखल घेत जर हा प्रकल्प झाला तर तो कसा असेल याचं सादरीकरण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केलेले आहे भविष्यात या प्रकल्पामुळे विकासाला चालना तसेच नव युवकांना रोजगार व्यवसायिकांना चांगला व्यवसाय मिळणार आहे. त्यामुळे या मॉडेलची चर्चा सोशल मीडियावर चांगली झाली आहे अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रातील संस्था या मॉडेलची पाहणी करण्यासाठी व मंडळाला भेट देण्यासाठी येत आहेत अतिशय सुंदर मॉडेल या तरुण कार्यकर्त्यांनी बनवला आहे.. गेले दीड महिने मंडळाचे कार्यकर्ते यासाठी झटत आहेत सरकारने याचा विचार करावा आणि विकासासाठी एक पाऊल पुढे यावं हीच गणपती बाप्पा कडे मागणी आहे. सर्वांनी हा प्रकल्प पाहण्यासाठी यावे ही मंडळाची विनंती तसेच त्यासाठी जे जे शक्य होईल तेथे करण्याचा प्रयत्न सर्व राजकीय पक्षांनी करावा ही सर्व नम्रतेची विनंती.
तरुण कार्यकर्त्यांनी
तरुण कार्यकर्त्यांनी