🔥 TRENDING পশ্চিমবঙ্গের নতুন শিল্প নীতি ইকো পার্ক... નાયબ મુખ્યમંત્રીએ ગાંધીનગરમાં 101 નવી... भोरमधील 141 वर्ष जुना दगडी पुल रस्त्या... Three Detained After Police Firing in... Odisha Revenue Officer Arrested for Br... Spinner's 6/22 Haul Stuns Andhra Prade...
06 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Politics

शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी नितीन पाचर्णे यांची बिनविरोध निवड!

✍️ Reporter: Anil Mallav 🗓 06 Nov 2026, 06:57 PM 👁 26
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक नितीन पाचर्णे यांची बिनविरोध निवड

शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी नितीन पाचर्णे यांची बिनविरोध निवड!

नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे यांच्या उपस्थितीत अभिनंदनाचा वर्षाव; समर्थकांकडून जल्लोषात स्वागत

शिरूर | दि. ६ नोव्हेंबर २०२६

शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक नितीन पाचर्णे यांची बिनविरोध निवड झाली. शुक्रवारी रसिकलाल धारिवाल सभागृहात झालेल्या विशेष सभेत एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली.

नगराध्यक्षपदावर ऐश्वर्या अभिजित पाचर्णे विराजमान असताना आता उपनगराध्यक्षपदही पाचर्णे परिवाराकडे आल्याने शिरूरच्या राजकीय वर्तुळात या निवडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

निवडीनंतर नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल बाबुराव पाचर्णे यांनी नितीन पाचर्णे यांचे अभिनंदन केले. यावेळी विविध राजकीय पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहरातील मूलभूत सुविधा, प्रलंबित प्रश्न आणि विकासकामांना प्राधान्य देऊन सर्वांना विश्वासात घेत लोकाभिमुख कारभार करण्याचा निर्धार नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष नितीन पाचर्णे यांनी व्यक्त केला.

निवडीनंतर समर्थकांकडून जल्लोषात स्वागत करत मिरवणूक काढण्यात आली. या निवडीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, शिरूर शहराच्या विकासाला आता कितपत गती मिळते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
📲Get App