🔥 TRENDING Uttar Pradesh CM Yogi Adityanath blame... BCCI bans India U-19 leg-spinner Rohit... Union Minister Shivraj Singh Leads Rur... China Has Constructed Around 30,000 Hi... Sikkim CM Golay assures Nepal of conti... श्रीराम विद्यालयाची विज्ञान नाटिका ‘चू...
04 Sep 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Sarkari Yojana

शहापूर तालुक्याच्या समश्या बाबत, माननीय बाळ्या मामा म्हात्रे भिवंडी लोक सभे चे खासदार यांनी जिल्हाधिकारी ठाणे यांची घेतली भेट.

✍️ Reporter: Kashinath Dhondu Desale 🗓 03 Sep 2026, 10:04 PM 👁 9
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
शहापूर तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांवर खासदार सुरेश म्हात्रे यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट; भावली धरण व बिरसा मुंडा स्मारकाबाबत सकारात्मक चर्चा!प्रतिनिधी: काशिनाथ देसले.दिनांक: ०३ सप्टेंबर २०२६.शहापूर:भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर खासदार सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे साहेब यांनी मतदारसंघातील विविध प्रलंबित आणि महत्त्वाच्या लोकहिताच्या प्रश्नांवर ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. डॉ. श्रीकृष्णजी पांचाळ साहेब यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या महत्त्वपूर्ण बैठकीत नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक निर्णय घेण्यात आले असून, तात्काळ आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.या बैठकीत विशेषतः शहापूर तालुक्यातील खालील महत्त्वाच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली:भावली धरण योजना (शहापूर): तालुक्यातील पाणीप्रश्न आणि सिंचनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या भावली धरण Y Piece Tapping संदर्भात या बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली. यामुळे या योजनेला गती मिळण्याची चिन्हे आहेत.बिरसा मुंडा स्मारक (शहापूर): आदिवासी समाजाचे प्रेरणास्थान असलेल्या क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या स्मारकाच्या जागेच्या मागणी प्रस्तावाबाबत खासदार म्हात्रे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. या जागेचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.या बैठकीमुळे शहापूर तालुक्यातील बऱ्याच दिवसांपासून रेंगाळलेले हे दोन्ही प्रश्न आता मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली असून, प्रशासनानेही यावर तातडीने पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे. या बैठकीला मतदारसंघातील इतर मान्यवर आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
📲Get App