🔥 TRENDING ગુજરાતના 12 જિલ્લાઓમાં ભારે વરસાદની ચે... અંબાજી ભાદરવી પૂનમ મેળામાં 27 મેડિકલ ક... સુરતમાં વરસાદ માટે લાલ એલર્ટ જાહેર અનોખો પ્રેમ.... Fire Breaks Out in Punjab Roadways Bus... સુરેન્દ્રનગરના લખતર તાલુકાના ભાલાળા ગા...
14 Sep 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

शेगावात श्रीचा ११६वा समाधी उत्सवाची तयारी

✍️ Reporter: Vilas Patil 🗓 14 Sep 2026, 01:22 PM 👁 27
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

मोठ्या भक्तीमय.वातावरणात साजरा होणार आहे

जळगाव जिल्हा प्रतिनिधी विलास पाटील

श्रींचा ११६ वा समाधी उत्सव १२ सप्टेंबरपासून; गणेशयाग, वरुणयाग व पालखी परिक्रमेचे आयोजन
श्रींचा ११६ वा समाधी उत्सव - २०२६ मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरा होणार आहे. शनिवार, भाद्रपद शु. १ दि. १२ सप्टेंबर २०२६ पासून या उत्सवास प्रारंभ होणार आहे.

उत्सव काळात श्री गणेशयाग व वरुणयागाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि. १२/०९/२०२६ पासून यागास सुरुवात होऊन मंगळवार दि. १५/०९/२०२६ रोजी सकाळी १० वाजता यागाची पूर्णाहुती व अवभृत स्नान होणार आहे.

यानंतर दुपारी श्रींच्या पालखीची भव्य परिक्रमा काढण्यात येणार आहे. या परिक्रमेत हजारो भाविक सहभागी होणार आहेत.

मंदिर संस्थानच्या वतीने उत्सवाची जय्यत तयारी सुरू असून भाविकांसाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रींचा पालखी सोहळा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
📲Get App