🔥 TRENDING कटनी: बकलेहटा में बिजली संकट से सूख रह... ગુજરાતમાં સ્થાનિક સ્વરાજ્યની ચૂંટણીના... निगोही: नाबालिग को बहला-फुसलाकर भगाने... Punjab Police Officer Injured in Encou... Drone Strike Hits Oil Tanker Near Soha... Tanker off Oman Ignites After Drone St...
13 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
शेंगोळ्यातील कापूस चोरीचा छडा लावला; फत्तेपूर पोलिसांकडून २ लाख ५४ हजारांचा मुद्देमाल जप्त, तिघे आरोपी ताब्यात...!!

शेंगोळ्यातील कापूस चोरीचा छडा लावला; फत्तेपूर पोलिसांकडून २ लाख ५४ हजारांचा मुद्देमाल जप्त, तिघे आरोपी ताब्यात...!!

✍️ Reporter: Maheshprasad Ramkrishnaprasad Dixit 🗓 13 Oct 2026, 08:08 AM 👁 14
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विभागीय प्रतिनिधी

जामनेर तालुक्यातील शेंगोळा शिवारातील कापूस चोरी प्रकरणाचा फत्तेपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. शेतातून कापूस चोरणाऱ्या तिघा जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीचा ४० किलो कापूस आणि गुन्ह्यात वापरलेली इको कार जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण २ लाख ५४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून, या घटनेमुळे शेतीमालाच्या चोरीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

शेंगोळा, ता. जामनेर येथील शेतकरी सदानंद कैलास जोशी (वय २५) यांच्या शेतात ९ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास चोरी झाली होती. अज्ञात चोरट्यांनी सुमारे दीड क्विंटल कापूस लांबवला होता. याबाबत जोशी यांनी फत्तेपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार १० ऑक्टोबर २०२६ रोजी गुन्हा रजिस्टर नंबर २२४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

शेतीमाल चोरीची ही घटना गंभीर मानून जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि पाचोरा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाचे आदेश देण्यात आले. फत्तेपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव यांनी विशेष पथक तयार करून तपासाला गती दिली.

तपास सुरू असताना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी जामनेर तालुक्यातील शहापूर येथून तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यांची नावे सैयद सोएब एजाज (वय ३१), सय्यद अनस महेमूद (वय १९) आणि शेख मोहम्मद रेहान अब्दुल कादर (वय २७), सर्व रा. शहापूर, ता. जामनेर अशी आहेत.

चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याकडून ४ हजार रुपये किमतीचा ४० किलो चोरीचा कापूस आणि गुन्ह्यासाठी वापरलेले वाहन जप्त करण्यात आले. जप्त केलेले वाहन मारुती सुझुकी कंपनीचे असून त्याचा क्रमांक MH २० FVY २५४० आहे. या गाडीची किंमत २ लाख ५० हजार रुपये आहे. असा एकूण २ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय अधिकारी बापू रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अंकुश जाधव यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.
📲Get App