🔥 ट्रेंडिंग తణుకు మున్సిపల్ ఎన్నికలలో 64.02% ఓటర్ల... ಮೈಸೂರಿನಲ್ಲಿ ಡಿ.ಕೆ. ಶಿವಕುಮಾರ್ ಅಬ್ಬರದ ಭಾ... 🚔ਨਵੇਂ ਐਸ.ਐਸ.ਪੀ. ਤਰਨ ਤਾਰਨ ਵੱਲੋਂ ਪ੍ਰੈੱਸ... रुतुर्ज गौइक्वाड का महाराष्ट्र SMAT मु... बीआरएस की ताकत में बढ़ोतरी, लोकसभा चुन... कांग्रेस नेता खड़गे का कहना, यूपी में...
26 नव. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
स्थानीय

संविधान दिनानिमित्त जनजागृती; समता आणि न्यायाच्या मूल्यांचा जागर

✍️ रिपोर्टर: Prashant Pradhan 🗓 26 नव. 2026, 08:26 PM 👁 23
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

श्रीयांश बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने जालन्यात संविधान दिन साजरा करण्यात आला. संस्थापक अध्यक्ष प्रशांत अशोक प्रधान यांनी नागरिकांना संविधानिक मूल्यांचे पालन करण्याचे आवाहन केले.

जालना : भारतीय लोकशाहीचा भक्कम पाया असलेल्या भारतीय संविधानाच्या सन्मानार्थ २६ नोव्हेंबर रोजी श्रीयांश बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त संविधानाचे महत्त्व, लोकशाही मूल्ये, नागरिकांचे मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये यांविषयी जनजागृती करण्याचा संदेश देण्यात आला. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय संविधान सभेने संविधानाचा स्वीकार केला होता. संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला समानतेचा, विचारस्वातंत्र्याचा आणि न्यायाचा अधिकार दिला आहे. संविधानामुळे विविध जाती, धर्म, भाषा आणि संस्कृती असलेल्या भारताला लोकशाहीच्या एका सूत्रात बांधण्याचे महत्त्वपूर्ण कार्य झाले आहे.

यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. प्रशांत अशोक प्रधान यांनी संविधान दिनाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी नमूद केले की, भारतीय संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नसून ते प्रत्येक भारतीयाच्या स्वाभिमानाचे, समानतेचे आणि अधिकारांचे प्रतीक आहे. संविधानाने नागरिकांना अधिकार दिले आहेत; मात्र त्या अधिकारांसोबत कर्तव्यांची जाणीव ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आजच्या काळात युवकांमध्ये लोकशाही मूल्यांची रुजवण करणे आणि सामाजिक भेदभाव दूर करणे ही काळाची गरज आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही मूल्ये केवळ भाषणांपुरती मर्यादित न राहता प्रत्यक्ष सामाजिक जीवनात उतरली पाहिजेत, असा संदेश त्यांनी दिला.

संविधान दिन हा केवळ उत्सवाचा दिवस नसून आत्मपरीक्षणाचा दिवस आहे, असेही प्रधान यांनी म्हटले आहे. नागरिकांनी आपल्या अधिकारांची आणि कर्तव्यांची जाणीव ठेवत समाजातील प्रत्येक व्यक्तीला समान सन्मान आणि संधी मिळण्यासाठी प्रयत्न करावेत. शिक्षण, सामाजिक प्रबोधन, युवक सक्षमीकरण आणि लोकजागृतीच्या माध्यमातून संविधानिक मूल्यांचा प्रसार करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन श्रीयांश बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने करण्यात आले.

संस्थेच्या वतीने दिलेल्या संविधान दिन संदेशात म्हटले आहे की, "संविधानाचा सन्मान हा केवळ शब्दांतून नव्हे, तर आपल्या कृतीतून दिसला पाहिजे. समतेचा विचार, बंधुतेची भावना आणि न्यायाची बांधिलकी जपूया. संविधानिक मूल्यांवर आधारित सक्षम, जागरूक आणि प्रगत भारत घडवूया!"
📲Get App