🔥 TRENDING किसानों के सीजन का टाइम है अभी भी इंदि... J&K Finance Dept Promotes Senior Assis... J&K Maps 30,000 Chinar Trees in New Di... Jammu & Kashmir IGP Reviews Diwali Tra... Speculation of Major Bihar Cabinet Shu... Madhya Pradesh Minister Kailash Vijayv...
06 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
सावंतवाडीत भाजपच्या भव्य दहीहंडी उत्सवात राजापूरच्या गोविंदा पथकाची बाजी; कुशल बद्रिके यांची विशेष उपस्थिती
Local

सावंतवाडीत भाजपच्या भव्य दहीहंडी उत्सवात राजापूरच्या गोविंदा पथकाची बाजी; कुशल बद्रिके यांची विशेष उपस्थिती

✍️ Reporter: Dr.Aniket Mestri 🗓 06 Sep 2026, 02:32 PM 👁 89
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

सावंतवाडी येथील राणी पार्वती देवी हायस्कूलच्या पटांगणावर आयोजित भाजपच्या भव्य दहीहंडी उत्सवात राजापूरच्या गोकुळ गोविंदा पथकाने सात थर रचून १,०१,१११ रुपयांचे पारितोषिक पटकावले.

सावंतवाडी येथील राणी पार्वती देवी हायस्कूलच्या पटांगणावर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे यांच्या संकल्पनेतून व आयोजनातून भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या थरारक सोहळ्यात राजापूर येथील गोकुळ गोविंदा पथकाने सात थरांचा मानवी मनोरा यशस्वीरित्या रचत बाजी मारली आणि एक लाख एक हजार एकशे अकरा रुपयांच्या भव्य बक्षीसाचे विजेतेपद पटकावले. या दहीहंडी सोहळ्याला नागरिकांनी प्रचंड गर्दी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

गेल्या अनेक वर्षांपासून संदीप गावडे यांच्या माध्यमातून सावंतवाडीत हा भव्य दहीहंडी उत्सव आयोजित केला जात आहे. यंदाच्या सोहळ्यात सावंतवाडीतील भटवाडी येथील महापुरुष मंडळाला दहीहंडी फोडण्याचा पहिला मान देण्यात आला. विविध गोविंदा पथकांनी यावेळी आपले उत्कृष्ट कौशल्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली. या सोहळ्याचे विशेष आकर्षण प्रसिद्ध अभिनेते कुशल बद्रिके यांची उपस्थिती हे ठरले, ज्यामुळे कार्यक्रमाची रंगत आणखीनच वाढली.

या भव्य कार्यक्रमाला भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, भाजप युवा नेते विनोद राऊळ, उपसभापती गौरव मुळीक, पंकज पेडणेकर, जितेंद्र गावकर, रवींद्र मडगावकर, मोहिनी मडगावकर, दिलीप भालेकर, सागर ढोकरे, पंकज तुळसूलकर, अभिजीत धुरी, अनिकेत आसोलकर, चैतन्य सावंत, साईनाथ हनपाडे, अभिषेक लाखे, किसान धोत्रे, अमित आसोलकर यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. गोविंदा पथकांच्या थरारक कामगिरीने आणि जल्लोषपूर्ण वातावरणात हा सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला.
📲Get App