🔥 TRENDING "ਤੁਹਾਡੇ ਤੋਂ ਬੋਲਿਆ ਤਾਂ ਜਾ ਨਹੀਂ ਰਿਹਾ, ਗਾ... स्थानीय स्तर पर दुर्गा पूजा का आयोजन सिकंदराराऊ रामलीला-रासलीला में आज लक्ष... 📰 कोठी वाले बालाजी महाराज के दरबार मे... નડિયાદના માઈ મંદિર માં આઠમ નવચંડી યજ્ઞ... ਪਰਵਿੰਦਰ ਝੋਟਾ ਦੇ ਪਰਿਵਾਰ ਨੇ ਪ੍ਰਸ਼ਾਸਨ ਅੱਗੇ...
19 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Religion

सरळगाव येथे सार्वजनिक नवरात्र उत्सवाचा रौप्यमहोत्सवी जल्लोष; !

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 19 Oct 2026, 09:29 PM 👁 22
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
सरळगाव येथे सार्वजनिक नवरात्र उत्सवाचा रौप्यमहोत्सवी जल्लोष; !
जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले ठाणे
तालुका रिपोर्टर किशोर पवार मुरबाड
मुरबाड सरळगाव, ता. मुरबाड:दिनांक १९/१०/२०२६
येथील सार्वजनिक उत्सव मंडळ सरळगाव आयोजित २५ व्या रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या सार्वजनिक नवरात्र उत्सव २०२६ चा भक्तिमय जल्लोष सध्या मोठ्या उत्साहात व भाविकांची दर्शना साठी गर्दीत सुरू आहे. ११ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या महोत्सवामध्ये रोज विविध धार्मिक, सांस्कृतिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे यशस्वी आयोजन केले.
या उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरत असलेल्या देवीच्या दर्शनासाठी संपूर्ण मुरबाड तालुक्यातून तसेच ठाणे जिल्ह्यातून राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची मांदियाळी सरळगाव नगरीत अवतरत आहे.
सामाजिक बांधिलकी: भव्य मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबीर
उत्सवाचे औचित्य साधून मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत भव्य मोफत सर्वसामान्य आरोग्य शिबीर आणि मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराला 'ईशा नेत्रालय, मुरबाड' यांचे विशेष सौजन्य व तांत्रिक सहकार्य लाभले. शिबिरादरम्यान परिसरातील शेकडो गरजू नागरिकांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली, तसेच डोळ्यांचे विकार असलेल्या रुग्णांना पुढील उपचारांचे मोफत मार्गदर्शन व औषधोपचार करण्यात आले. मंडळाच्या या स्तुत्य सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरांतून भरभरून कौतुक होत आहे.
नामवंत भजनी मंडळांची उपस्थिती आणि सांस्कृतिक कार्यक्रम
उत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे परिसरातील समृद्ध भजन संस्कृतीचे दर्शन या निमित्ताने घडले. या कार्यक्रमात उंबरपाडा, नवापाडा, सरळगाव, किन्हवली, मुगाव, मुरबाड आणि नागाव परिसरातील नामांकित भजनी मंडळांनी हजेरी लावून एकापेक्षा एक सुंदर भजने सादर केली. भजनांच्या या सुश्राव्य सुरांनी संपूर्ण परिसर भक्तीरसात न्हाऊन निघाला होता. यासोबतच पारंपरिक देवीचा जागर गोंधळ आणि विविध स्तरांवरील उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. तसेच महिलांसाठी विशेष खेळ व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, महिला वर्गाचा उदंड प्रतिसाद लाभला.मुख्य आकर्षक होम मनिस्टर कार्यक्रम
मान्यवरांची उपस्थिती आणि दर्शनाचा लाभ
नुकतीच ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्री. सुभाष दादा पवार आणि श्री. उल्हास बांगर यांनी उत्सव मंडपास भेट देऊन आदिशक्तीचे दर्शन घेतले व महाआरतीमध्ये सहभाग घेतला. तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मुरबाड तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते यांनीही उपस्थित राहून देवीचे आशीर्वाद घेतले.
याशिवाय, शैक्षणिक क्षेत्रातील नामांकित भादाणे हायस्कूलचे सर्व शिक्षक वृंद आणि कर्मचारी वर्ग, तसेच परिसरातील प्रतिष्ठित नागरिक व भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. या संपूर्ण सोहळ्याचे सूत्रसंचालन श्री. खेडेकर सर यांनी अत्यंत कुशलतेने केले. उत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री. मधुकर (आप्पा) नारायण घूड आणि सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे यथोचित स्वागत करण्यात आले.आज दिनांक १९/१०/२०२६, रोजी शप्त सती पाठ, होम हवन आणि महाप्रसाद करण्यात आला.
आगामी कार्यक्रम: विजयादशमी निमित्त स्पेशल रास दांडिया आणि २१ ला विसर्जन सोहळा
मंडळाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, उद्या दिनांक २० ऑक्टोबर २०२६ रोजी नेहमीप्रमाणे नियोजित धार्मिक विधी व कार्यक्रम पार पडणार आहेत. तसेच या रात्री विजयादशमी (दसरा) निमित्त 'स्पेशल रास दांडिया' चा भव्य रंगारंग कार्यक्रम आयोजित करण्यात आलाआहे.
देवीचा भव्य विसर्जन मिरवणूक सोहळा दिनांक २१ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २:३० वाजता पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि जल्लोषात निघणार आहे. या विसर्जन सोहळ्याला आणि महाआरतीला सर्व भाविक भक्तांनी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सार्वजनिक उत्सव मंडळ, सरळगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.
📲Get App