🔥 TRENDING પ્રાંતિજમાં વિદેશી દારૂની હેરાફેરીમાં... नवविवाहिता पर 7.05 लाख की लूट, एक संदि... Congress Leaders Sachin Pilot, Partap... Old Saraighat Bridge in Guwahati Reope... Assam Announces Rs 50,000 Crore Invest... JCECEB Announces Round 1 Seat Allotmen...
16 Sep 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
सरळगांव: धनलक्ष्मी ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा माजी जि. प. उपाध्यक्ष सुभाष दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न
National

सरळगांव: धनलक्ष्मी ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा माजी जि. प. उपाध्यक्ष सुभाष दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

✍️ Reporter: Kashinath Dhondu Desale 🗓 06 Sep 2026, 03:10 PM 👁 80
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

ठाणे जिल्ह्यातील सरळगांव येथील धनलक्ष्मी ग्रामीण बिगरशेती पतसंस्था मर्यादितची वार्षिक सर्वसाधारण सभा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

ठाणे: सरळगांव येथील धनलक्ष्मी ग्रामीण बिगरशेती पतसंस्था मर्यादित या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा यशस्वीरित्या संपन्न झाली आहे. या सभेचे अध्यक्षपद ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष दादा पवार यांनी भूषवले.

सुभाष दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या वार्षिक सर्वसाधारण सभेला संस्थेचे सभासद आणि पदाधिकारी उपस्थित होते. सभेमध्ये संस्थेच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.कर्ज मर्यादा व कर्जदार सभासदा चा विमा
यावर चर्चा करण्यात आली.संस्थेचे चेअरमन पंढरीनाथ घुडे यांनी प्रास्ताविक भाषण केले.व्यवस्थाप चंद्रकांत घुडे यांनी अहवाल वाचन केले,
नव निर्वाचित ठाणे पालघर बँकेचे संचालक श्री सौरभ सुभाष पवार प्रमुख पाहुणे होते, श्री रामभाऊ दळवी, श्री धनाजी दळवी
व्यास पिठावर संस्थेचे आजी माजी चेअरमन, संचालक, सदस्य, सर्व सभासद, कर्मचारी वृंद, कर्ज दार सदस्य, ग्रामपंचायतसरळगाव प्रशासक सुनीता एगडे, ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती मुरबाड चे माजी सदस्य, दुध उत्पादक
सोसायटी चे चेअरमन, पत संस्था सरळगावचे आजी सर्व संचालक, कमेटी. यांच्या मार्ग दर्शन नाने, व खेळी मेळीने
आजची सभा पार पडली
दळवी सर यांचे मार्ग दर्शन, आणि सुभाष दादा यांचे अद्यक्षीय भाषणाने व आयोजकांच्या आभार प्रदर्शनाने वार्षिक सभा
संपन्न झाली

या कार्यक्रमाचे सविस्तर वृत्त जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले, ठाणे यांनी दिले आहे.
📲Get App