🔥 TRENDING હાથીદરા ગામમાં દિવાળી અને બેસતા વર્ષે... DC Ganderbal Reviews winter preparedne... वाराणसी में डाला छठ एवं देव दीपावली के... गोंडा में महिला कांस्टेबल पर गोंडा पटा... शराब की दुकान से मिले खुले पाऊज और शरा... Bina licence ki gadi chalate hue do la...
10 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Entertainment

सूर-तालांच्या मैफिलीतून बळीराजाला मदतीचा हात; आ. किसनजी कथोरे यांच्या उपस्थितीत ‘दिवाळी पहाट’ उत्साहात!

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 10 Nov 2026, 07:59 PM 👁 19
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
नीड २४ न्यूज महाराष्ट्र
मुरबाड विशेष बातमी पत्र | दिनांक: ११/११/२०२६
जिल्हा रिपोर्टर: काशिनाथ देसले (ठाणे) | सह तालुका रिपोर्टर: किशोर पवार (मुरबाड)
सूर-तालांच्या मैफिलीतून बळीराजाला मदतीचा हात; आ. किसनजी कथोरे यांच्या उपस्थितीत ‘दिवाळी पहाट’ उत्साहात!
मुरबाड (प्रतिनिधी) :-
दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकी जपत कल्याण येथील फडके मैदानावर ‘कल्याण गौरव प्रस्तुत दिवाळी पहाट’ या विशेष सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय जनता पार्टी (कल्याण पश्चिम), मंगेशी ग्रुप तसेच केडीएमसी नगरसेवक श्री. शामल गायकर आणि माजी नगरसेवक श्री. संदीप गायकर यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला.
या सोहळ्याला मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार मा. श्री. किसनजी कथोरे यांनी विशेष उपस्थिती लावली. त्यांनी कल्याणकरांसोबत दिवाळीच्या आनंदात सहभागी होत नागरिकांशी संवाद साधला आणि सर्वांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. सुरेल सांस्कृतिक मेजवानी आणि बळीराजाच्या मदतीचा उदात्त हेतू लाभलेल्या या कार्यक्रमाला कल्याणकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
📲Get App