🔥 TRENDING ਵਿਧਾਇਕ ਦਿਨੇਸ਼ ਚੱਢਾ ਨੇ ਨਵੀ ਅਬਾਦੀ ਵਿੱਚ ਲ... નારોલ પોલીસ દ્વારા નશીલા પદાર્થની ધરપક... नवादा में फर्जीवाड़े के मामले में प्रध... અમરેલીની કોવાયા અલ્ટ્રાટેક સ્કૂલની વિદ... झोलाछाप डॉक्टर ओमपाल गिरफ्तार, बच्चे क... ਵਿਧਾਇਕ ਦਿਨੇਸ਼ ਚੱਢਾ ਨੇ ਝਾਗੜੀਆਂ ਅਤੇ ਸਾਖਪ...
15 Sep 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

सप्तऋषींना वंदन करण्यासाठी ऋषिपंचमी व्रतं महिलांमध्ये उत्साह

✍️ Reporter: Vilas Patil 🗓 15 Sep 2026, 05:28 PM 👁 20
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

गिरणा नदी पात्रात स्नान करूनजल अर्पण करताना महिला

जळगाव प्रतिनिधी विलास पाटील



*सप्तर्षींना वंदन करण्यासाठी आज ऋषी पंचमी व्रत महिलांमध्ये उत्साह, दिनांक १५ सप्टेंबर २०२६ भाद्रपद शुद्ध पंचमी म्हणजेच ऋषी पंचमी आज मंगळवार दि. १५ सप्टेंबर २०२६ रोजी साजरी होत आहे. पंचमी तिथी आज सकाळी ७:४४ वाजता सुरू होऊन उद्या सकाळी ८:५९ पर्यंत असणार आहे. मध्यान्ह काळी पंचमी असल्याने आजच ऋषी पंचमी व्रत पाळले जात आहे.

आजचा दिवस सप्तर्षी - कश्यप, अत्री, भरद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि वसिष्ठ या सात ऋषींना समर्पित आहे. त्यांच्यासोबत वसिष्ठ पत्नी अरुंधतीची देखील पूजा केली जाते.

हिंदू मान्यतेनुसार या व्रताचे विशेष महत्त्व महिलांसाठी आहे. मासिक पाळी दरम्यान कळत-नकळत झालेल्या दोषांच्या परिमार्जनासाठी, पापमुक्तीसाठी आणि पवित्रतेसाठी हे व्रत केले जाते. यंदा हरतालिका, गणेश चतुर्थी आणि ऋषी पंचमी हे तीनही सण सलग आल्याने अधिक उत्साह आहे.

पूजा विधी:आज सकाळी महिलांनी पवित्र नदीत स्नान करून, १०८ वेळा आघाड्याच्या काडीने दात घासून शुद्धीकरण केले जाते. उपवास करून दुपारी ११:०२ ते १:३० या शुभ मुहूर्तावर सप्तर्षींची स्थापना करून पूजा, कथा वाचन व आरती केली जाते. या दिवशी नांगरलेल्या जमिनीत उगवलेले धान्य खाणे टाळले जाते, त्याऐवजी फळे, कंदमुळे, समा तांदूळ यांचा उपवास केला जातो.

जिल्ह्यातील विविध मंदिरांमध्ये आज सकाळपासूनच महिला भाविकांची गर्दी दिसून येत आह आहे
📲Get App