Education
सम्राट अशोक हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, चिचपल्ली येथे अस्वच्छता आणि शिस्तीचा अभाव; पत्रकाराला पाहणीसाठी परवानगी नाकारली

चिचपल्ली : येथील सम्राट अशोक हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या परिसरात अस्वच्छता आणि शिस्तीचा अभाव असल्याचे निदर्शनास आल्याचा दावा करण्यात आला आहे.
Need 24 न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी डॉ. पिंटू पॉल यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीची तसेच शाळेतील स्वच्छता, शिस्त आणि शैक्षणिक वातावरणाची पाहणी करण्यासाठी भेट दिली असता, परिसरात अनेक ठिकाणी स्वच्छतेचा अभाव दिसून आला. शाळेच्या आवारात फुटलेल्या काचेचे तुकडे आणि इतर अस्वच्छता आढळून आल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
सकाळी १० ते ११:३० या वेळेत शाळेत उपस्थित असताना, सकाळी ११:११ वाजताच्या सुमारास अनेक विद्यार्थी व शिक्षक वर्गखोल्यांमध्ये उपस्थित नसून बाहेर फिरताना दिसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या कालावधीत राष्ट्रगीत किंवा अन्य कोणत्याही प्रकारची सामूहिक प्रार्थना अथवा प्रार्थनासभा सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले नाही. त्यामुळे शाळेतील दैनंदिन शिस्त आणि शैक्षणिक कामकाजाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, अभ्यासातील प्रगती, शिक्षकांची उपस्थिती आणि शाळेतील शैक्षणिक वातावरण यांची माहिती घेण्याच्या उद्देशाने डॉ. पिंटू पॉल यांनी मुख्याध्यापकांकडे पाहणीची परवानगी मागितली. मात्र, मुख्याध्यापकांनी शिक्षणाधिकाऱ्यांचे अधिकृत पत्र घेऊन या, त्याशिवाय परवानगी देता येणार नाही, असे स्पष्ट सांगून पाहणीस परवानगी नाकारल्याचे डॉ. पॉल यांनी सांगितले.
शिक्षण विभागाने लक्ष देण्याची गरज
शाळेतील स्वच्छता, विद्यार्थ्यांची सुरक्षितता, शिक्षकांची उपस्थिती, नियमित अध्यापन आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती या महत्त्वाच्या बाबींची संबंधित शिक्षण विभागाने प्रत्यक्ष तपासणी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि सुरक्षित शैक्षणिक वातावरण मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी Need 24 न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी डॉ. पिंटू पॉल यांनी केली आहे.