🔥 TRENDING उमरिया जिला जेल में ई-केवाईसी एवं विधि... અરબ સાગરમાં ₹3000 કરોડના ડ્રગ્સ સાથે 5... भितरवार विधायक मोहन सिंह राठौर ने श्या... शिवपुरी मेडिकल कॉलेज के सामने से 50-60... जनता की समस्याओं का निवारण Haryana Anti-Drug Body CEO Emphasises...
30 Sep 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
साकेगाव बसस्थानकावर जुन्या वादातून दोन तरुणांवर प्राणघातक हल्ला; दोघांची प्रकृती चिंताजनक...!!!

साकेगाव बसस्थानकावर जुन्या वादातून दोन तरुणांवर प्राणघातक हल्ला; दोघांची प्रकृती चिंताजनक...!!!

✍️ Reporter: Maheshprasad Dixit 🗓 30 Sep 2026, 06:35 PM 👁 8
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विभागीय प्रतिनिधी

भुसावळ - तालुक्यातील साकेगाव येथील बसस्थानकावर जुन्या वादातून दोन तरुणांवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

साकेगाव येथील रहिवासी राहुल संतोष कोळी (वय २४) आणि कुणाल बाळू वाघ (वय २३) अशी जखमींची नावे आहेत. मंगळवारी (दि. २९) रात्री सुमारे ८ वाजेच्या सुमारास दोघे जण रुग्णालयात जाण्यासाठी बसस्थानकावर आले होते. त्याच वेळी भुसावळ येथील काही तरुण तेथे आले आणि जुन्या वादावरून त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली.

बघता बघता वाद विकोपाला गेला आणि संशयितांनी धारदार शस्त्राने दोघांवर वार केले. या हल्ल्यात राहुल कोळी याच्या मानेसह अंगावर गंभीर जखमा झाल्या असून कुणाल वाघ हादेखील गंभीर जखमी झाला आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच भुसावळ तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणातील संशयितांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून पोलिसांकडून त्यांचा कसून शोध घेतला जात आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
📲Get App