🔥 TRENDING JD(U) chief Nitish Kumar allocates ele... Muzaffarpur College Students Block Roa... Congress raises concerns over CC road... Three Senior Doctors Cleared in Kota O... Mumbai CPWD Engineer and Four Others A... કુંકાવાવ-વડિયા તાલુકામાં ‘સેવા સેતુ’ ક...
03 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

साईकृपा सदगुरू फाउंडेशनचा चौथा वर्धापन दिन: महा आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

✍️ Reporter: Dr.Aniket Mestri 🗓 03 Oct 2026, 04:50 PM 👁 29
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

साईकृपा सदगुरू फाउंडेशन (एनजीओ) भारतने आपला चौथा वर्धापन दिन २ ऑक्टोबर २०२६ रोजी मरोळ येथे एका भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करून साजरा केला. या कार्यक्रमात समाजसेवकांना सन्मानित करण्यात आले.

साईकृपा सदगुरू फाउंडेशन (एनजीओ) भारत या संस्थेने आपला चौथा वर्धापन दिन सोहळा २ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत साईनाथ नगर, मरोळ पाईपलाईन येथे एका भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करून मोठ्या उत्साहात साजरा केला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. सूर्यकांत गुणाजी गावणकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.

याप्रसंगी संस्थेच्या कार्याचा गौरव करण्यात आला. साईकृपा सदगुरू फाउंडेशन ही संघटना समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत असून, अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आणि प्रबोधनाच्या माध्यमातून समाजाला उन्नतीकडे नेण्यासाठी प्रयत्नशील आहे. या सोहळ्यात संस्थेसाठी तन-मन-धनाने काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना 'समाजसेवा गौरव पुरस्कार' आणि संस्थेला सातत्याने सहकार्य करणाऱ्या समाजसेवकांना 'समाजरत्न पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले.

या गौरवशाली सोहळ्याला विलेपार्ले पोलीस स्टेशनच्या सौ. दिपाली यशवंत सिनारे मॅडम, कुणबी समाजोन्नती संघ मुंबईचे सहचिटणीस श्री. माधव कांबळे, कुणबी युवा मुंबईचे सरचिटणीस श्री. सचिन रामाणे, मनसे वाहतूक विभाग अध्यक्ष श्री अनुप गुप्ता, रा.काँ. पक्षाचे तालुकाध्यक्ष वाशिम हाशमी, कु. यू. मु. खजिनदार पांडुरंग दोडेकर, उपाध्यक्ष श्वेता सूर्यकांत गावणकर, सचिव विकास रामाणे, उपसचिव संजय बेंनबन्सी, खजिनदार गंगाधर कुंभारे, सल्लागार प्रशांत वाजे, मुंबई जिल्हा अध्यक्ष अनिकेत धुर्यो, मुंबई जिल्हा महिला अध्यक्ष स्मिता जाधव, मुंबई जिल्हा महिला उपाध्यक्ष आस्था माईल, मुरुड तालुका अध्यक्ष सुशांत वडके, चांदीवली तालुका अध्यक्ष वीरू गिरी, संघर्ष नगर विभाग अध्यक्ष शुभम सिंग, विलेपार्ले महिला विभाग अध्यक्ष स्नेहल महाडिक, शांताक्रुज विभाग अध्यक्ष संजय वाईकर, संघर्ष नगर महिला विभाग अध्यक्ष शेजाव, दहिसर मोरी विभाग अध्यक्ष पांडुरंग गावडे, शिवडी विभाग अध्यक्ष जितेंद्र पटेल, घनसोली विभाग अध्यक्ष प्रतीक जाधव, संघर्ष नगर विभाग कार्याध्यक्ष प्रशांत शेजाव तसेच इतर कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.

सचिव विकास रामाणे यांनी संस्थेच्या चार वर्षांच्या वाटचालीचा इतिहास सांगत कार्यक्रमाची सांगता केली.
📲Get App