🔥 TRENDING Karna and Tara’s Search for Grandmothe... Jaggamamma Dismisses Gilli’s Win as ‘C... Yashas Counters Tandav’s Accusation Am... બનાસકાંઠા LCB દ્વારા રાજસ્થાનના બે કુખ... Bigg Boss Kannada 13 contestant Likhit... Minister Ramalinga Reddy Writes Letter...
11 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Entertainment

सचिन शिवाजी मल्लाव यांच्या घरी बाळूमामांच्या आरतीचा भक्तिमय सोहळा

✍️ Reporter: Anil Mallav 🗓 11 Oct 2026, 04:34 PM 👁 10
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

क्षेत्र आदमापूर येथील पुजारी श्री. सांगळे हे आरतीसाठी उपस्थित

शिरूर | प्रतिनिधी | ११ ऑक्टोबर २०२६

नवरात्रोत्सवानिमित्त रविवार, ११ ऑक्टोबर रोजी श्री. क्षेत्र आदमापूर येथील बाळूमामांच्या आरतीचा भक्तिमय कार्यक्रम शिरूर येथे श्री. सचिन शिवाजी मल्लाव यांच्या निवासस्थानी उत्साहात पार पडला.

या प्रसंगी श्री. क्षेत्र आदमापूर येथील पुजारी श्री. सांगळे हे आरतीसाठी उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत बाळूमामांची विधिवत आरती करण्यात आली. यावेळी परिसरातील भक्तगणांनी मोठ्या श्रद्धेने आरतीमध्ये सहभाग घेतला.

आरतीच्या वेळी भारतीय जनवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. अनिल मल्लाव, पुणे जिल्हाध्यक्ष तथा कोषाध्यक्ष श्री. लक्ष्मण शरद मल्लाव, शिरूर तालुका कोषाध्यक्ष श्री. रोहित मल्लाव, शिरूर तालुका युवा अध्यक्ष मोर्चा श्री. सचिन सुदाम मल्लाव, तसेच शिरूर तालुका कार्याध्यक्ष श्री. करण विजय मल्लाव यांच्यासह इतर भक्तगण उपस्थित होते.

भक्तिमय वातावरणात झालेल्या या आरतीनंतर उपस्थितांनी बाळूमामांचे दर्शन घेतले. कार्यक्रमामुळे परिसरात धार्मिक आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले.
📲Get App