🔥 TRENDING Gujarat donates 70‑kg twin Shri Yantra... पेट्रोल पंप कर्मचारी पर चोरी का आरोप Steven Spielberg’s First Western Film... Mohanlal Visits Anoop Sathyan’s Film S... Revanth Reddy celebrates Diwali with I... Hyderabad Gold Prices on Nov 8: 22K an...
09 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
ऋद्धपूरयेथे श्री गोविंद प्रभू अवतार दिन सोहळा

ऋद्धपूरयेथे श्री गोविंद प्रभू अवतार दिन सोहळा

✍️ Reporter: Vilas Supadu Patil 🗓 23 Sep 2026, 08:02 PM 👁 104
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

महानुभाव पंथाची काशी म्हणून ओळख

ऋद्धपूर येथे २४ सप्टेंबर रोजी श्री गोविंदप्रभू अवतार दिन सोहळा मोठ्या जल्लोषात

ऋद्धपूर (जि. अमरावती) दिनांक२४ सप्टेंबर रोजी

महानुभाव संप्रदायाचे पंचावतारांपैकी एक आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे गुरु श्री गोविंदप्रभू (गुंडम राऊळ) महाराज यांचा अवतार दिन सोहळा आज दि. २४ सप्टेंबर रोजी अमरावती जिल्ह्यातील ऐतिहासिक व पवित्र तीर्थक्षेत्र ऋद्धपूर (वृद्धपूर) येथे मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे.

या पावन प्रसंगी ऋद्धपूर येथील मुख्य श्री गोविंदप्रभू राजमठ तसेच परिसरातील विविध मंदिरांमध्ये विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे मंगल स्नान उटी गंध विडा अवसर महापूजा, महाआरती, लीळाचरित्र पारायण, महाप्रसाद आणि पालखी सोहळा अशा विविध धार्मिक अधिष्ठानांनी परिसर दुमदुमून गेला आहे.

महानुभाव पंथात श्री गोविंदप्रभू महाराजांचे स्थान अत्यंत अढळ आहे. त्यांनी ऋद्धपूरच्या भूमीत अनेक लीला केल्या आणि प्रेम, भक्ती व समतेचा संदेश दिला.

या विशेष दिनानिमित्त महाराष्ट्र, गुजरात, पंजाब मध्य प्रदेश यांसह देशभरातून हजारो भाविक ऋद्धपुरात दाखल झाले असून संपूर्ण नगरी 'श्री गोविंदप्रभू बाबांच्या' जयघोषाने भक्तीरसात न्हाऊन निघाली आहे.

भाविकांच्या सोयीसाठी राजमठ संस्थान व प्रशासनातर्फे चोख व्यवस्था करण्यात आली आहे.
📲Get App