🔥 ट्रेंडिंग नगर परिषद मोहना में अमृत 2.0 योजना का... મુખ્યમંત્રી ભૂપેન્દ્ર પટેલની ઉપસ્થિતિમ... કોટલાવ ગામમાં ગણપતિ બાપાને 56 ભોગ ધરાવ... સચીન પોલીસ સ્ટેશનના ૧૮ લાખની છેતરપિંડી... વિરપુર ગામમાં દરગાહનો ઉર્સ યોજાયો गुरुवार को दिल्ली की हवा मध्यम, एनसीआर...
24 सित. 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
रायसोनी नगरात भरदिवसा चोरीचा थरार; दुकानात घुसून महिलेचे मंगळसूत्र लंपास, दुचाकीवरून चोरट्यांचा पोबारा...!!!

रायसोनी नगरात भरदिवसा चोरीचा थरार; दुकानात घुसून महिलेचे मंगळसूत्र लंपास, दुचाकीवरून चोरट्यांचा पोबारा...!!!

✍️ रिपोर्टर: Maheshprasad Dixit 🗓 24 सित. 2026, 03:54 PM 👁 10
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विभागीय प्रतिनिधी

जळगाव : शहरातील रायसोनी नगर परिसरात भरदिवसा चोरीची धक्कादायक घटना घडली आहे. बॉल खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेल्या दोन भामट्यांनी किराणा दुकानदार महिलेच्या गळ्यातील २० ग्रॅम वजनाची सोन्याची पोत जबरीने हिसकावून पोबारा केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

रायसोनी नगर येथील रहिवासी सुमित्रा मनोहर खर्चे (वय ४९) यांनी त्यांच्या घराच्या कंपाऊंडमध्ये 'ओम प्रोव्हीजन' नावाने किराणा दुकान सुरू केले आहे. दि. २२ सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास त्या दुकानात असताना तोंडाला रुमाल बांधलेले दोन तरुण दुचाकीवरून त्यांच्या दुकानावर आले.

त्यातील एकाने "बॉल चाहिए" असे म्हणत काऊंटरवर ठेवलेल्या बरणीतून एक बॉल काढला आणि "बरणीतून सगळे बॉल बाहेर काढा" असे म्हणू लागला. त्यावर सुमित्रा यांनी "तसे होणार नाही, यातीलच एक बॉल निवडून घे" असे सांगितले. त्यानंतर त्या तरुणाने ६० रुपये दिले. बॉलची किंमत ५० रुपये असल्याने सुमित्रा यांनी १० रुपये परत देण्यासाठी काऊंटरवरील बरणीवर ठेवले.

पैसे परत देत असतानाच संशयिताने अचानक काऊंटरच्या आत वाकून सुमित्रा यांच्या गळ्यातील २० ग्रॅमची सोन्याची पोत जोरात ओढली आणि क्षणात दुचाकीवर बसून दोघेही भरधाव वेगाने पसार झाले.

सुमित्रा यांनी "चोर... चोर..." अशी आरडाओरड करताच परिसरातील नागरिक धावून आले व चोरट्यांचा पाठलागही केला, मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते.

या प्रकरणी सुमित्रा खर्चे यांनी दिलेल्या तक्रारीवरून रामानंद नगर पोलिसांनी अज्ञात दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

पोलीस प्रशासनाचे नागरिकांना सावधानतेचे आवाहन

या घटनेच्या पार्श्वभूमीवर रामानंद नगर पोलीस प्रशासनाने नागरिकांना, विशेषतः महिला दुकानदारांना सतर्कतेचे आवाहन केले आहे.

अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नका: दुकानात एकटे असताना तोंडाला रुमाल बांधलेल्या किंवा संशयास्पद वाटणाऱ्या ग्राहकांपासून सावध राहा.

अशी कोणतीही संशयास्पद घटना किंवा व्यक्ती आढळल्यास तात्काळ ११२ किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
📲Get App