🔥 TRENDING बिजनौर: मस्जिद में तेज आवाज लाउडस्पीकर... ग्वालियर पुलिस विवेचकों के लिए नवीन आप... અમિતાભ બચ્ચનના 84મા જન્મદિવસ પર 'જલસા'... आदर्श विद्या मंदिर, नाचना के विद्यार्थ... ਪਰਗਟ ਸਿੰਘ ਨੇ ਸਚਿਨ ਪਾਇਲਟ ਨਾਲ ਦਿੱਲੀ 'ਚ ਕ... ग्वालियर चिड़ियाघर से नवविवाहिता के ला...
12 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Health

रायगडमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन; ९० नागरिकांनी घेतला लाभ

✍️ Reporter: Dr.Aniket Mestri 🗓 12 Oct 2026, 07:14 PM 👁 16
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

रायगड जिल्ह्यात 'क्षयरोग मुक्त भारत' मोहिमेअंतर्गत आयोजित आरोग्य शिबिरात ९० नागरिकांनी विविध आरोग्य तपासण्यांचा लाभ घेतला. ८ रुग्णांना पुढील उपचारांसाठी संदर्भित करण्यात आले.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यात येत असलेल्या 'क्षयरोग मुक्त भारत – १०० दिवस मोहिमे' अंतर्गत भारतीय महाक्रांती सेना आरोग्य विभाग, अष्टविनायक हॉस्पिटल (मोहपाडा, रसायनी), जिल्हा क्षयरोग केंद्र रायगड व जिल्हा आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने केळवणे पाडा ग्रामपंचायत येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून एकूण ९० नागरिकांनी विविध आरोग्य तपासण्यांचा लाभ घेतला.

या शिबिरात रक्तदाब (BP), रक्तातील साखर (RBS), ईसीजी (ECG) तपासण्या करण्यात आल्या. तसेच डॉक्टरांचा सल्ला, क्षयरोगाबाबत जनजागृती आणि विविध आजारांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तपासणीदरम्यान अधिक उपचारांची आवश्यकता असलेल्या ८ रुग्णांना पुढील उपचारांसाठी अष्टविनायक हॉस्पिटल, मोहपाडा (रसायनी) येथे संदर्भित करण्यात आले.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. अनिकेत मेस्त्री (MJPJAY विभाग, MOD) यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्यासमवेत डॉ. प्रेम पोतदार, स्टाफ नर्स स्नेहल कांबळे, विशाखा शिगवण तसेच सहाय्यक अशोक उगलमुगले यांनी रुग्ण तपासणी व व्यवस्थापनात मोलाचे योगदान दिले. केळवणे उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आरोग्य सेवक, आशा सेविका आणि ग्रामपंचायत कार्यालयानेही उल्लेखनीय सहकार्य केले.

आरोग्य सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे, क्षयरोगाविषयी जनजागृती करणे आणि आजारांचे वेळेत निदान करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. उपस्थित नागरिकांनी आयोजक संस्थांच्या या समाजोपयोगी उपक्रमाचे कौतुक केले आणि भविष्यातही अशी शिबिरे सातत्याने आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
📲Get App