🔥 TRENDING নবান্ন নিয়ে সাংবাদিক বৈঠক লাইভে অনুষ্... સરદાર પટેલની જન્મજયંતી નિમિત્તે ગુજરાત... સુરત ગ્રામ્ય ટ્રાફિક શાખાના ASI અને ખા... mathurabarsana गाली में भी अमृत सा सुख... Rameez Ahmed Named Sub‑Editor of Jammu... Vehicle Rolls Down Hill in Reasi, Woma...
29 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Entertainment

राया मला पळून न्या की राव’ लावणीने जपली पारंपरिक लावणीची रंगत

✍️ Reporter: Anil Mallav 🗓 29 Oct 2026, 05:07 PM 👁 16
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

पारंपरिक बैठकीच्या लावणीची रंगत, ग्रामीण जीवनाची झलक आणि तमाशा कलेची खास शैली अनुभवायला मिळते.

‘राया मला पळून न्या की राव’ लावणीने जपली पारंपरिक लावणीची रंगत

पुणे | प्रतिनिधी : 29 ऑक्टोंबर 2026

आधुनिक काळात तमाशातील पारंपरिक लावणीचा प्रकार हळूहळू लोप पावत असताना, तृप्ती फिल्म प्रोडक्शनचे निर्माता, दिग्दर्शक, लेखक, कवी, गायक व अभिनेता रामदासजी राऊत यांनी पारंपरिक लावणी कलेला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या निर्मितीत साकारलेली ‘राया मला पळून न्या की राव’ ही लावणी सध्या रसिकांचे लक्ष वेधून घेत आहे.

या लावणीमध्ये पारंपरिक बैठकीच्या लावणीची रंगत, ग्रामीण जीवनाची झलक आणि तमाशा कलेची खास शैली अनुभवायला मिळते. उत्कृष्ट ढोलकी वादन, हार्मोनियमचे सुरेल वादन आणि गायकांच्या प्रभावी आवाजामुळे लावणीला अधिक उठाव मिळाला आहे.

ही लावणी ऐकताना ‘सांगते ऐका’, ‘एक गाव बारा भानगडी’ आणि ‘पिंजरा’ यांसारख्या जुन्या मराठी कलाकृतींमधील लावणीची आठवण होत असल्याची भावना रसिकांकडून व्यक्त केली जात आहे. पारंपरिक लावणीची ढब आणि ग्रामीण वातावरणाची अनुभूती यामुळे या सादरीकरणाला विशेष दाद मिळत आहे.

महाराष्ट्रातील तमाशा आणि लावणी कलावंतांना पुन्हा चांगले दिवस यावेत, तसेच या पारंपरिक कलेला नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने रामदास राऊत यांनी केलेला हा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे मत व्यक्त होत आहे.

या लावणीच्या निर्मितीशी संबंधित सर्व कलाकार, वादक, गायक आणि तांत्रिक टीमचे महाराष्ट्र राज्याचे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, पुणे येथील विकास अत्रे यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. कलाकारांनी यापुढेही अशाच दर्जेदार कलाकृती सादर कराव्यात आणि त्यांना रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळावा, अशी शुभेच्छाही त्यांनी व्यक्त केली.
📲Get App