🔥 TRENDING कलेक्टर साकेत मालवीय ने अशोकनगर कलेक्ट... ವೈದ್ಯಕೀಯ ಸೀಟುಗಳ ಭರ್ತಿಗೆ KEA ವಿಶೇಷ ಸ್ಟ್... ग्राम के सरपंच घीसाराम जी सांखला का ना... आजमनगर क्रिकेट टूर्नामेंट के फाइनल में... चिचपल्ली येथे पेट्रोल पंपासमोर अज्ञात... ಬೇಂಗಲೂರಿನ ಸಂಚಾರ ದಟ್ಟಣೆ ಕಡಿಮೆ ಮಾಡಲು ಹೆಬ...
02 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Entertainment

राया मला पळून घ्या की राव’च्या चित्रीकरणाला दिमाखदार प्रारंभ!

✍️ Reporter: Anil Mallav 🗓 02 Nov 2026, 02:43 PM 👁 43
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

राया मला पळून घ्या की राव’ या बहुचर्चित लावणी

‘राया मला पळून घ्या की राव’च्या चित्रीकरणाला दिमाखदार प्रारंभ!

वसंतराव जगताप यांच्या हस्ते शुभारंभ; शुभांजली थोरात यांच्या अदाकारीने रंगणार लावणी

शिरूर | २ नोव्हेंबर २०२६

तृप्ती फिल्म प्रोडक्शन निर्मित ‘राया मला पळून घ्या की राव’ या बहुचर्चित लावणीच्या चित्रीकरणाचा शुभारंभ बोराडे मळा येथील ‘समर्थ गार्डन लॉन्स’ येथे उत्साहात पार पडला. साई समर्थ पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष वसंतराव जगताप उर्फ अण्णा यांच्या हस्ते शूटिंगचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी पतसंस्थेचे उपाध्यक्ष म्हेत्रे साहेब, सचिव सोनवणे साहेब व खजिनदार संजय विश्वासराव प्रमुख उपस्थित होते. लावणीला गणेश आस्वार यांनी संगीत दिले असून, भक्ती स्टुडिओचे संचालक अविष्कार विश्वासराव यांचे तांत्रिक योगदान लाभले आहे. ‘नृत्य बिजली’ शुभांजली थोरात यांच्या बहारदार अदाकारीने लावणीच्या चित्रीकरणाला रंगत आली.

यावेळी अशोकराव शेळके, अशोकराव सोनवणे, काळुराम गवारी, भाऊसाहेब शिंदे, नवनाथ शिंदे, माजी सरपंच संतोष आरवडे, नारायण शेठ मदगे, पत्रकार अनिल मल्लाव यांच्यासह संगीत व अभिनय क्षेत्रातील कलाकार उपस्थित होते.

चित्रीकरणासाठी सहकार्य केल्याबद्दल समर्थ गार्डन लॉन्सचे संचालक तुळशीराम पांढरे यांचे निर्माते रामदास जी. राऊत यांनी आभार मानले. लावणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
📲Get App