🔥 ट्रेंडिंग 7 अक्टूबर 2026: राजस्थान में मुख्यमंत्... ফ্রান্সিস হালজেনকে পদার্থবিদ্যায় নোবে... पूर्व मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान ने... પ્રવાસીઓ- સહેલાણીઓ માટે મહત્ત્વનો નિર્... मिज़ोरम में 13 अक्टूबर को आयोजित होने... अरुणाचल प्रदेश के मंत्री ने महिला‑बच्च...
07 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

रावेरच्या केऱ्हाळे येथे नशेत रक्तरंजित हत्याकांड; ग्राइंडर कटरने गळा चिरल्याने २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू.......!!

✍️ रिपोर्टर: Maheshprasad Ramkrishnaprasad Dixit 🗓 07 अक्टू. 2026, 04:08 PM 👁 22
यहाँ देखें: ▶️ YouTube
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
किरकोळ वादातून ६२ वर्षीय मिस्त्रीकडून खून, परिसरात खळबळ

विभागीय प्रतिनिधी

रावेर तालुक्यातील केऱ्हाळे गावाच्या इंदिरानगर परिसरात मंगळवारी (दि. ६ ऑक्टोबर) दुपारच्या सुमारास धक्कादायक हत्याकांड उघडकीस आले आहे. दारूच्या नशेत झालेल्या किरकोळ वादातून ६२ वर्षीय इसमाने २३ वर्षीय तरुणाची ग्राइंडर मशीनच्या कटरने गळ्यावर वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने केऱ्हाळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

रामसिंग भील (वय ६२, रा. केऱ्हाळे) असे संशयित आरोपीचे नाव असून, राजू कापडे (वय २३) असे मयत तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी रामसिंग भील हा व्यवसायाने मिस्त्री असून, मयत राजू कापडे हा त्याला नियमितपणे जेवणाचा डबा पोहोचवण्याचे काम करत होता. मंगळवारी दुपारी दोघेही मद्यप्राशन करून नशेत होते. त्यावेळी गंमतीने दगड मारण्याच्या कारणावरून दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची आणि शिवीगाळ झाली.

या शाब्दिक वादाचे काही वेळातच हाणामारीत रूपांतर झाले. संतापाच्या भरात रामसिंग भील याने जवळच असलेल्या ग्राइंडर मशीनचे कटर उचलून राजू कापडे याच्या गळ्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात राजूच्या मानेला गंभीर दुखापत होऊन तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच रावेर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मयताचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास रावेर पोलीस करीत आहेत.
📲Get App