🔥 TRENDING தேசிய நீச்சல் போட்டி: சேலம் சிறுவன் சா... Chennai Police Arrest Live-in Partner... Bhopal Police Offer Reward for Caretak... சாலையை ஆக்கிரமித்த பதாகையால் விபத்தில்... Dehradun: Wife and Lover Arrested in L... Saiju Kurup Starts Voice‑Dubbing for M...
05 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

रावेर पोलिसांची धडक कारवाई! कत्तलीसाठी चाललेले 40 हजारांचे 4 गोवंश मुक्त, एक तस्करावर गुन्हा दाखल......!!

✍️ Reporter: Maheshprasad Ramkrishnaprasad Dixit 🗓 05 Oct 2026, 07:20 AM 👁 10
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विभागीय प्रतिनिधी

रावेर - तालुक्यातील विश्रामजिन्सी येथून रावेर शहराच्या दिशेने कत्तलीसाठी निर्दयीपणे हाकलत नेल्या जाणाऱ्या चार गोवंशांची रावेर पोलिसांनी सुटका केली आहे. या धडक कारवाईचे प्राणीप्रेमींमधून जोरदार स्वागत होत असून पोलिसांचे कौतुक केले जात आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विश्रामजिन्सी (ता. रावेर) येथून रावेरकडे चार गोवंश जातीची गुरे कत्तलीसाठी नेली जात असल्याची गुप्त माहिती रावेर पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ सापळा रचून कारवाई केली आणि चारही गोवंशांना ताब्यात घेतले. या गुरांची अंदाजे किंमत 40 हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.

धक्कादायक बाब म्हणजे, या चारही मुक्या जनावरांच्या मानेभोवती घट्ट दोर बांधण्यात आले होते. त्यांना रावेरच्या दिशेने पायी हाकलत नेले जात होते. या दरम्यान त्यांच्यासाठी चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती, हा गंभीर प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आला.

याप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल ईश्वर जुलालसिंग चव्हाण यांच्या फिर्यादीवरून रशीद नथ्थू तडवी यांच्या विरोधात रावेर पोलीस ठाण्यात संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चारही गोवंश ताब्यात घेऊन त्यांची सुखरूप सुटका केली आहे.

या कारवाईमुळे अवैध गोवंश वाहतूक आणि मुक्या प्राण्यांवरील क्रूरतेला आळा बसणार असून, संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी प्राणीप्रेमींमधून होत आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन करीत असून, हे गोवंश नक्की कुठून आणले होते, त्यांना कुठे नेले जात होते आणि यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे.
📲Get App