🔥 ट्रेंडिंग कर्नाटक में वोटर्स की हटाने को लेकर डी... रेलवे NTPC ग्रेजुएट स्तर पर 3477 पदों... कर्नाटक से पानी की आपूर्ति में अनिश्चि... लेफ्ट जनरल करनबीर ब्रार (सेवानिवृत्त)... राजस्थान बोर्ड कक्षा 10 परीक्षा दो बार... 21 अक्टूबर को दशमी पर रिलायंस जियो IPO...
05 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
रत्नागिरीतील मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनाने मच्छिमार पाल्यांसाठी आयोजित केला 'सेवा संकल्प' निबंध स्पर्धा
शिक्षा

रत्नागिरीतील मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनाने मच्छिमार पाल्यांसाठी आयोजित केला 'सेवा संकल्प' निबंध स्पर्धा

✍️ रिपोर्टर: Dr.Aniket Mestri 🗓 05 अक्टू. 2026, 06:06 PM 👁 12
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

कोकणातील मच्छिमार समाजाच्या पाल्यांमध्ये शाश्वत मत्स्यव्यवसाय आणि आधुनिक तंत्रज्ञानाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव-रत्नागिरी यांच्या वतीने 'सेवा संकल्प' अभियानांतर्गत निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

कोकणातील विद्यार्थी व युवकांमध्ये शाश्वत मत्स्यव्यवसाय, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि विकसित भारत २०४७ या विषयांवर जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव-रत्नागिरी यांच्या वतीने 'सेवा संकल्प' अभियानांतर्गत निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी दोन विषय निश्चित करण्यात आले आहेत. पहिला विषय म्हणजे 'विकसित भारत २०४७ : शाश्वत मत्स्य व्यवसायाची दिशा आणि उद्दिष्टे' आणि दुसरा विषय म्हणजे 'तंत्रज्ञानाच्या साथीने मत्स्य क्षेत्राचा विकास : विकसित भारताकडे वाटचाल'.

मच्छिमार सोसायटीच्या माध्यमातून इच्छुक विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. मात्र, स्पर्धक मच्छिमार सहकारी संस्थेच्या सदस्यांचा मुलगा किंवा मुलगी (पाल्य) असावा, अशी अट आहे. स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी मच्छिमार सोसायटी सभासदांच्या पाल्यांनी जास्तीत जास्त सहभागी होऊन आपल्या विचारांना व्यासपीठ उपलब्ध करून घ्यावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. केतन चौधरी यांनी केले आहे.

या स्पर्धेचे नियम अत्यंत स्पष्ट ठेवण्यात आले आहेत. निबंध मराठी भाषेत ११०० ते १२०० शब्दांचा असावा. तो ए-४ आकाराच्या पेपरवर पुरेसा समास सोडून, कागदाच्या एकाच बाजूला स्वहस्ताक्षरात लिहलेला असावा. परीक्षणात निबंध विषयाची समज, मांडणी, भाषाशैली आणि एकूण प्रभाव या घटकांना महत्त्व देण्यात येणार आहे. स्पर्धकांना वरीलपैकी एकाच विषयावर एकच निबंध सादर करता येईल. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील, असेही नोटिफिकेशनमध्ये नमूद करण्यात आले आहे.

इच्छुक स्पर्धकांनी १२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत त्यांचे निबंध सादर करावेत. निबंध स्वतः, पोस्ट किंवा कुरिअर द्वारे प्राचार्य, मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी ता. जि. रत्नागिरी पिन -४१५६२९ या कार्यालयाच्या पत्यावर पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
📲Get App