Local
रत्नागिरी: अरेबियन समुद्रात जहाजावरील इजिप्तच्या नागरिकाचा मृत्यू; जयगड सागरी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद
Watch on:
▶️ YouTube
अरेबियन समुद्रात 'एम.व्ही. रेक एलाइट' जहाजावर कार्यरत असलेल्या इजिप्तच्या एका ३५ वर्षीय अधिकाऱ्याचा मृत्यू झाला असून, या प्रकरणी रत्नागिरीतील जयगड सागरी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रत्नागिरी जवळील अरेबियन समुद्रात 'एम.व्ही. रेक एलाइट' (MV REK ELITE) या जहाजावर कार्यरत असलेल्या इजिप्तच्या एका नागरिकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी जयगड सागरी पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्लाम आदेल अहमद अब्देल लतिफ (वय ३५) असे मृत नागरिकाचे नाव असून ते इजिप्तचे रहिवासी होते. ते या जहाजावर सेफ्टी ऑफिसर व थर्ड ऑफिसर म्हणून कार्यरत होते. १० एप्रिल २०२६ रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास 'एम.व्ही. रेक एलाइट' हे जहाज अरेबियन समुद्रात १४.१० N/५५.२८ E या लोकेशनवर असताना ही घटना घडली.
या घटनेनंतर १६ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १२.४५ वाजता जयगड येथील जेएसडब्ल्यू पोर्टवर प्राथमिक आरोग्य केंद्र वाटद-खंडाळा येथील अधिकृत वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जहाजावर जाऊन मृतदेहाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या प्रकरणाची कागदपत्रे सुरुवातीला मुंबईतील यलोगेट पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली होती. मात्र, घटनास्थळ त्यांच्या कार्यक्षेत्रात येत नसल्याने ही कागदपत्रे पुन्हा रत्नागिरी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे पाठवण्यात आली.
रत्नागिरी पोलीस अधीक्षकांच्या १० सप्टेंबर २०२६ रोजीच्या आदेशानुसार, या प्रकरणाची पुढील चौकशी करण्यासाठी कागदपत्रे जयगड सागरी पोलीस ठाण्याकडे सोपवण्यात आली. त्यानुसार, जयगड सागरी पोलिसांनी १७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११.२६ वाजता आकस्मिक मृत्यू रजिस्टर क्रमांक ३५/२०२६ अन्वये या घटनेची नोंद केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जयगड सागरी पोलिसांकडून सुरू आहे.