🔥 ट्रेंडिंग आईआईटी दिल्ली के इंजीनियर ने अपनी मंगे... समस्तीपुर में छेड़खानी केस: 4 गिरफ्तार... जोधपुर में ग्रामीणों ने 3 बच्चों की मा... વાવ ગામે ગણેશ વિસર્જન સંપન્ન: શ્રી ગજા... सेवा-संकल्प अभियान: ग्वालियर में बाइक... ઈડરના ધારાસભ્ય રમણલાલ વોરા 75માં વર્ષમ...
25 सित. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
शिक्षा

रिसोडच्या सनराईज इंग्लिश स्कूलमध्ये ११ वा आयुर्वेद दिन उत्साहात साजरा; वृक्षारोपणाने दिला निसर्ग संवर्धनाचा संदेश

✍️ रिपोर्टर: Rameshwar Devidas Ranjwe 🗓 25 सित. 2026, 07:20 PM 👁 15
यहाँ देखें: ▶️ YouTube 📘 Facebook 📷 Instagram
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

रिसोड येथील सनराईज इंग्लिश स्कूलमध्ये 'एक स्वास्थ्य, एक भविष्य' या संकल्पनेवर आधारित ११ वा आयुर्वेद दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने परिसंवाद आणि 'मेरा आयुर वृक्ष' उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले.

दि आर्य शिक्षण संस्थेच्या सनराईज इंग्लिश स्कूल, रिसोड येथे २३ सप्टेंबर रोजी ११ वा आयुर्वेद दिन "एक स्वास्थ्य, एक भविष्य: पुराव्यांवर आधारित सायन्स, नाविन्यता आणि सर्वंगीण काळजीद्वारे आयुर्वेदाचे एकत्रीकरण" या संकल्पनेवर आधारित विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

यानिमित्ताने इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसाठी एक विशेष परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. निरोगी जीवनशैलीसाठी आयुर्वेदाचे महत्त्व, वैज्ञानिक पुरावे, आधुनिक तंत्रज्ञान आणि सर्वंगीण आरोग्य सेवा यांची सांगड कशी घालावी, याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. साक्षी परिहार आणि कु. रोशनी सरनाईक उपस्थित होत्या, ज्यांनी आयुर्वेदाची महती विशद केली.

शाळेच्या प्राचार्या सौ. रोज मेरी जोस यांनी अध्यक्षीय भाषणात या उपक्रमाचे कौतुक केले आणि विद्यार्थ्यांना भारताच्या समृद्ध आयुर्वेदिक वारशाचा अभ्यासपूर्ण अंगीकार करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे "मेरा आयुर वृक्ष" या संकल्पनेअंतर्गत राबवण्यात आलेली वृक्षारोपण मोहीम. औषधी वनस्पती, निसर्ग, पर्यावरण आणि मानवी आरोग्य यांच्यातील संबंधांवर भर देत विद्यार्थ्यांनी "झाडे लावा, भविष्य वाचवा" असा संदेश दिला.

या प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा सौ. जयश्रीताई देशमुख, सचिव श्री. नकुल दादा देशमुख आणि विश्वस्त श्री. चैतन्य भैया देशमुख यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. इयत्ता नववीच्या कुमारी गौरी नागरे आणि कुमारी सृष्टी शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
📲Get App