🔥 TRENDING ભાદરવી પૂનમના મહામેળા બાદ NSS દ્વારા ‘... Heavy Rain Forecast Issued for Chennai... Myvi.in Lists Malayalam OTT Releases f... Kerala Gold Rates for 22 & 24 Carat Re... Delhi Police Constable Attacked During... Telangana rice prices climb as El Niño...
29 Sep 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

रक्त रंजीत लोणावळा

✍️ Reporter: Satish Manik Hajare 🗓 29 Sep 2026, 11:12 AM 👁 11
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

लोणावळा : येथील शांती चौक परिसरात एका तरुणावर वार करण्यात आले

लोणावळा : येथील शांती चौक परिसरात

एका तरुणावर धारदार हत्याराने वार करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना शनिवारी (दि. २६ सप्टेंबर) दुपारी घडली. या प्रकरणी लोणावळा शहर पोलिसांनी राहुल यशवंत वाघमारे याच्याविरुद्ध जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा
दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रमोद प्रकाश फाटे (वय ३४, रा. औंढे रोड, कुसगाव, ता. मावळ) हे शनिवारी दुपारी २.३० वाजता लोणावळ्यातील शांती चौक येथे चरण यांच्या चिक्कीच्या दुकानासमोर उभे होते. यावेळी कथित आरोपी राहुल यशवंत वाघमारे याने कोणतेही कारण नसताना फिर्यादी यांच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे. आरोपीने फिर्यादीच्या डोक्यात, खांद्यावर तसेच डाव्या हातावर धारदार हत्याराने सपासप वार करत त्याला. जीवे ठार
मारण्याची धमकी देत जीवे ठार मारण्याचा
प्रयत्न देखील केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या हल्ल्यात प्रमोद फाटे हे गंभीर जखमी झालेला असल्याने फाटे याला खाजगी रुग्णालयात दाखल करून त्यांचा वर उपचार सुरू आहेत या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास लोणावळा पोलीस उपनिरीक्षक चंदनशिवे करीत आहेत.
📲Get App