🔥 ट्रेंडिंग इंदौर के भागीरथपुरा बस्ती में कांग्रेस... நெல்லை: சூறாவளி காற்றால் சேதமடைந்த ஆயி... गौरी गणपति मेन्स वियर का भव्य पुनर्उद्... अजय देवगन की थ्रिलर 'दृश्यम 3' 2 अक्टू... અમદાવાદના નારોલમાં રાજસ્થાનથી લવાયેલો... रामगढ़ पुलिस ने मिलकपुर जंगल में अवैध...
04 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
देश

*रिक्षातील प्रवाशाला कोयत्याचा धाक दाखवुन लुटणाऱ्या सराईत टोळीला दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन तपास पथकाने २४ तासाच्या आत केले जेरबंद.*

✍️ रिपोर्टर: Uday Borse 🗓 04 अक्टू. 2026, 06:02 PM 👁 16
यहाँ देखें: ▶️ YouTube 📘 Facebook
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
📍 *रिक्षातील प्रवाशाला कोयत्याचा धाक दाखवुन लुटणाऱ्या सराईत टोळीला दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन तपास पथकाने २४ तासाच्या आत केले जेरबंद.*
फिर्यादी नामे अजय चिंतामन देसलेपाटील, वय २९ वर्षे यांना दिनांक २८/०९/२०२६ रोजी रात्रौ १०.०० वा.चे सुमारास मौजे निघोजे गावचे हद्दीत एमएआरजे टेक्ने प्लास्ट कंपनीसमोर निघोजे तळवडे ब्रिज रोडवर, निघोजे, ता. खेड, जि. पुणे यांना अनोळखी रिक्षा चालक व त्याचे दोन साथीदार आरोपी यांनी संगणमत करुन फिर्यादी यांचे पॅन्ट व शर्टाचे खिश्यातील ११,४७०/-रुपये रोख रक्कम फिर्यादीला कोयत्याचा धाक दाखवुन दमदाटी करुन मुददाम लबाडीचे इरादयाने जबरदस्तीने चोरुन नेली म्हणुन तीन अनोळखी इसमांविरुध्द फिर्यादी आहे अशा फिर्यादीचे जबाबावरुन दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गु.र.क्र. ७८७/२०२६ बी.एन.एस. ३०९ (४), ३(५), आर्म अॅक्ट क. ४(२५) प्रमाणे गुन्हा रजिस्टरी दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हयाचे गांभिर्य लक्षात घेवून वरिष्ठांनी तात्काळ वेगवेगळे तपास पथक तयार करुन आरोपीचा शोध घेण्याकरीता रवाना करण्यात आले असता तपास पथकाने कोणताही सुगावा नसताना सीसीटव्हीचे तांत्रिक विष्लेशन करुन रिक्षाचा क्रमांक प्राप्त करुन आरोपींना २४ तासाच्या आत यातील आरोपी नामे १) अमन ऊर्फ शाहबाज समीर शेख, वय २६ वर्षे व २) शेखर बापू माने, वय २१ वर्षे यांना ताब्यात घेवुन त्याचेकडे चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास अटक केली आहे, तसेच एका विधी संघर्षीत बालक यास ताब्यात घेवुन बाल न्यायमंडळ यांचे समक्ष हजर करण्यात आले.
तसेच यातील आरोपी नामे अमन ऊर्फ शाहबाज समीर शेख, वय २६ वर्षे हा निगडी पोलीस स्टेशन कडील मोक्का गुन्हयातुन १५ दिवसापूर्वीच जामीनावर जेलमधून बाहेर आला होता. तसेच त्याचेवर वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत.
आहेत. तसचे यातील आरोपीने शेखर बापु माने, वय २१ वर्षे याचेवर जबरी चोरी व माराहाण असे गुन्हे दाखल
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे, मा. सह पोलीस आयुक्त, डॉ. श्री. शशिकांत महावरकर, मा.अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. सारंग आवाड, मा. अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक) डॉ. बसवराज तेली, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ४, श्रीमती श्वेता खेडकर, सहायक पोलीस आयुक्त श्रीमती. प्रिया डमाळे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. विजय डमाळ, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. अनिल देवड, पोलीस उपनिरीक्षक, श्री. संतोष जायभाये, पोलीस हवालदार चेतन सावंत, पोलीस शिपाई राजेंद्र खेडकर, प्रविण बांबळे, शिवाजी मरकड, राजेश गिरी, आकाश घाडगे, व राजकुमार हणमंते यांनी केली आहे. तसेच दाखल गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शरद पिंजारी हे करत आहेत.
📲Get App