🔥 ट्रेंडिंग दिल्ली पुलिस ने पुष्टि की वायरल गुप्त... दिल्ली के मुख्यमंत्री ने नई प्रदूषण नि... दिल्ली में हल्की बारिश; दक्षिण भारत मे... हरियाणा ने स्कूल संबद्धता की समय सीमा... फ़रिडाबाद में मुखौटा पहने अजनबी ने किश... हरियाणा ओपन स्कूल ने कक्षा 10 की अक्टू...
06 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
राजापूर तालुक्यात पाचल परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, शेतकऱ्यांना दिलासा
स्थानीय

राजापूर तालुक्यात पाचल परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, शेतकऱ्यांना दिलासा

✍️ रिपोर्टर: Dr.Aniket Mestri 🗓 06 अक्टू. 2026, 11:30 AM 👁 20
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

पाचल परिसरात सोमवार, ५ ऑक्टोबर रोजी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला, परंतु गणेशोत्सवापासून पावसाच्या अभावामुळे भातपीकाला मोठे नुकसान आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.

सोमवार, ५ ऑक्टोबर रोजी राजापूर तालुक्याच्या पूर्व भागासह पाचल परिसरात वीजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू झाला. सायंकाळी उशिरापर्यंत परिसरात कोणत्याही प्रकारच्या नुकसानीची नोंद झाली नव्हती.

गणेशोत्सवापूर्वीपासून पावसाने विश्रांती घेतल्याने यंदाच्या भातशेतीवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. पाऊस गायब झाल्याने अनेक ठिकाणी भातपीक पुरेसे पोसले गेले नाही. त्यातच काही भागात भातपिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या भातपिकाच्या उत्पादनाबाबत शेतकरी चिंतेत आहेत.

दीर्घकाळ पाऊस नसल्याने अनेक जलस्रोतही आटण्याच्या मार्गावर होते. ग्रामीण भागात पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. तसेच पावसाअभावी वातावरणात मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण झाली होती. मात्र, सोमवारी झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून सर्वसामान्यांनाही दिलासा मिळाला आहे.

पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या आशा या पावसामुळे पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. भातपिकाला या पावसाचा कितपत फायदा होतो, याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
📲Get App