🔥 ट्रेंडिंग રાજકોટમાં ગાંધીગ્રામમાં યુવકની છરીની ઘ... द रिअल पॅंथर ऑफ इंडिया ने जिल्हा सरचिट... पलामू में 53349‑53350 शटल ट्रेनों में... કચ્છમાં દુધઈ નજીક 3.1 તીવ્રતાનો ભૂકંપ,... સાવરકુંડલા તાલુકાના વાંશીયાળી ગામમાં ગ... અમરેલી જિલ્લામાં પ્રોહિબિશન ઝુંબેશમાં...
23 नव. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
स्थानीय

राजगड तालुक्यात 101 कोटी 15 लक्ष रुपयांच्या विकास कामांचे आमदार शंकर मांडेकर यांच्या हस्ते भूमिपूजन

✍️ रिपोर्टर: किरण सदाशिव आंबिके 🗓 23 नव. 2026, 11:40 AM 👁 20
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

राजगड तालुक्यात स्थानिक आमदार शंकर मांडेकर यांच्या नेतृत्वाखाली 101 कोटी 15 लक्ष रुपयांच्या विकास प्रकल्पाची भूमिपूजन समारंभ पार पडला.

राजगड तालुक्यात स्थानिक आमदार शंकर मांडेकर यांच्या नेतृत्वाखाली 101 कोटी 15 लक्ष रुपयांच्या विकास प्रकल्पाची भूमिपूजन समारंभ पार पडला. या भरीव निधीतून होणाऱ्या कामांमुळे ऐतिहासिक आणि दुर्गम अशी ओळख असलेल्या राजगड तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला मोठी चालना मिळणार आहे. या निधीअंतर्गत तालुक्यातील विविध रस्ते, साकव पूल, आरोग्य केंद्र, सभामंडप बांधणे, मंदिर सुधारणा, पाणीपुरवठा आणि इतर महत्त्वाच्या पायाभूत सुविधांची कामे हाती घेण्यात येणार आहेत. आमदार शंकर मांडेकर यांच्या मागणी आणि पाठपुराव्यानुसार राजगड तालुक्यामध्ये हा 101 कोटी 15 लक्ष रुपये खर्चाच्या विविध विकासकामांसाठी निधी मंजूर करून आणला आहे. या कामांमुळे दळणवळण सुलभ होणार आहे आणि ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. या कार्यक्रमाला तालुक्यातील विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, सरपंच, उपसरपंच, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
📲Get App