🔥 TRENDING હિંમતનગર: કાંકણોલ ખાતે ‘રંગતાળી 2026’... गंगापुर सिटी: मां इंदरगढ़ देवी की 44वी... कुणबी समाजोन्नती मंडळाच्या वतीने सामाज... रीवा में लाखों की चोरी, पुलिस जांच में... માંગરોળ-કેશોદ રોડ પર રખડતા ઢોરનો આતંક:... વીરમગામ ટાઉન પોલીસે જુગાર રમતા 7 શખ્સો...
14 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
पावसाने दडी मारल्याने मुरबाड तालुक्यात भात पिकांचे मोठे नुकसान; दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी!
Agriculture

पावसाने दडी मारल्याने मुरबाड तालुक्यात भात पिकांचे मोठे नुकसान; दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी!

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 14 Oct 2026, 04:10 PM 👁 8
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
पावसाने दडी मारल्याने मुरबाड तालुक्यात भात पिकांचे मोठे नुकसान; दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी!

मुरबाड विशेष वृत्त :किशोर पवार मुरबाड
जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले ठाणे
दिनांक १५/१०/२०२६.सुभाष पवार (दादा)
यांनी ग्रामस्थांसह थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली पिकांची पाहणी
मुरबाड (प्रतिनिधी - किशोर पवार):
मुरबाड तालुक्यात चालू हंगामात पावसाने अचानक दडी मारल्याने विविध खरीप पिकांचे, प्रामुख्याने भात शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतातील उभी पिके डोळ्यादेखत करपून गेल्यामुळे तालुक्यातील शेतकरी बांधव अत्यंत मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. या गंभीर परिस्थितीची दखल घेत ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्री. सुभाष गोटूराम पवार (दादा) यांनी मुरबाड तालुक्यातील विविध गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन परिस्थितीची पाहणी केली.
सुभाष पवार (दादा) यांनी तालुक्यातील शिंदीपाडा, कोलठण, मानिवळी, भालूक, डेहनोली आणि माल्हेड या गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. यावेळी पावसाअभावी शेतजमिनीला मोठमोठ्या भेगा पडल्याचे आणि भात पिके पूर्णपणे सुकल्याचे विदारक चित्र पाहायला मिळाले. शेतकऱ्यांची व्यथा ऐकून घेतल्यानंतर त्यांनी प्रशासनाने तातडीने या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी केली आहे.
माध्यमांशी बोलताना सुभाष पवार म्हणाले, "शेतातील उभी पिके करपल्याने शेतकरी पूर्णपणे कोलमडला आहे. 'शेतकरी जगला तरच देश जगेल.' त्यामुळे शासनाने कोणतीही दिरंगाई न करता तातडीने मुरबाड तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती जाहीर करावी. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, शेती कर्जामध्ये सवलत आणि पुढील हंगामासाठी आर्थिक आधार देणे अत्यंत आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या या न्याय्य हक्कांसाठी आम्ही प्रशासनाकडे ठोस मागणी करणार आहोत."
या पाहणी दौऱ्यावेळी स्थानिक बाधित शेतकरी, ग्रामस्थ आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या:

• मुरबाड तालुका तातडीने दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा.
• शेतातील भात पिकांसह सर्व खरीप पिकांचे तातडीने पंचनामे करून मदत द्यावी.
• पीक विमा व आर्थिक मदत तात्काळ मंजूर करून शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावी.
• शेतकऱ्यांना बियाणे, खत आणि वीज बिलात विशेष सवलत देण्यात यावी.
• तालुक्यात भविष्यातील पाण्याचे संकट टाळण्यासाठी सिंचनाची दीर्घकालीन उपाययोजना करावी.
📲Get App