🔥 TRENDING કર્ણાવતી, અમદાવાદમાં નિકોલની સરવા સોસા... टाटा ट्रकचा भीषण अपघात, लांजा अंजणारी... ઓછા વરસાદને કારણે ગુજરાતમાં ખેડૂતોની 3... સાબરકાંઠા જિલ્લામાં વરસાદ ખેંચાવાને કા... સાબરકાંઠા જિલ્લામાં વરસાદ ખેંચાવાને કા... “બેંકમા ખોટા દસ્તાવેજો રજુકરી લોન લઈને...
05 Sep 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

प्राथमिक शाळा बोरनार येथे दहीहंडी उत्सव

✍️ Reporter: Vilas Patil 🗓 05 Sep 2026, 09:52 AM 👁 17
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

चिमुकल्या गोविंदाची दहीहंडी

## **प्राथमिक शाळा बोरनार येथे दहीहंडी उत्सव अत्यंत उत्साहात संपन्न; बाळगोपाळांचा अभूतपूर्व सहभाग!**
**बोरनार:**
येथील जि.प. प्राथमिक शाळेमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक वातावरणात साजरा करण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांनी या उत्सवात मोठ्या जोश्यात व आनंदाने सहभाग घेतला. या आनंददायी सोहळ्याचे आयोजन शाळेचे **मुख्याध्यापक श्री. शरद पाटील** व **उपशिक्षक श्री. योगेश देसले** यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात गोपाळकाला व श्रीकृष्णाच्या पूजनाने झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी बासरी व पारंपरिक वेषात सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. शाळेच्या प्रांगणात चिमुकल्या चिमुकल्या गोविंदांनी मानवी थर रचून अत्यंत उत्साहात दहीहंडी फोडली. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि त्यांच्यातील जिद्द पाहण्यासारखी होती.
या उत्सवाच्या यशस्वी आयोजनाबद्दल परिसरामध्ये विद्यार्थ्यांवर आणि शाळा व्यवस्थापनावर कौतुकाचा वर्षाव होत असून, मुख्याध्यापक श्री. शरद पाटील व उपशिक्षक श्री. योगेश देसले यांनी सर्व विद्यार्थी व पालकांचे आभार मानले.
📲Get App