🔥 ट्रेंडिंग ઉગલવાણથી નાના આસણારા તરફ જતા રોડની સ્થ... मोहम्मदी मंडी में अव्यवस्था का बोलबाला... ଭୁବନେଶ୍ୱରରେ ଘରେ ପଶି ଯୁବତୀଙ୍କୁ ଦୁଷ୍କର୍ମ... ‘ସୁଜଳ’ ଅଭିଯାନର ଶୁଭାରମ୍ଭ କଲେ ନଗର ଉନ୍ନୟନ... ଓଡ଼ିଶା ଖଣି ଯାନ୍ତ୍ରିକ ବିଦ୍ୟାଳୟ ହଷ୍ଟ୍ରେଲର... କୌନ ବନେଗା କରୋଡ଼ପତି ହଟ ସିଟରେ ମୟୁରଭଞ୍ଜ ଝ...
03 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
स्थानीय

परेश मयेकर रत्नागिरी शासकीय रुग्णालयाचे नवीन सुरक्षा अधिकारी

✍️ रिपोर्टर: Dr.Aniket Mestri 🗓 03 अक्टू. 2026, 11:58 AM 👁 23
यहाँ देखें: ▶️ YouTube
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

गेली नऊ वर्षे रुग्णालय आणि रुग्णांच्या सेवेत तत्पर असलेले परेश मयेकर यांची रत्नागिरी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सुरक्षा अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली १६० सुरक्षा रक्षकांचे पथक काम करेल.

रत्नागिरी प्रतिनिधी: रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात गेल्या नऊ वर्षांपासून प्रामाणिकपणे सेवा बजावणारे परेश मयेकर यांच्यावर आता वैद्यकीय शासकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे सुरक्षा अधिकारी म्हणून मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. रुग्ण, नातेवाईक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी सातत्याने पुढाकार घेणाऱ्या मयेकर यांच्या कामाची दखल घेऊन ही नियुक्ती करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सुरक्षा अधिकारी म्हणून नियुक्त होणारे ते पहिले अधिकारी ठरले आहेत.

सुरक्षा रक्षक म्हणून सुरू झालेल्या त्यांच्या सेवाप्रवासाला नेतृत्वाची नवी दिशा मिळाली आहे. गेल्या नऊ वर्षांतील त्यांची कार्यतत्परता, रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेचा अनुभव, शिस्तीवर असलेला भर आणि सेवाभावी वृत्ती यांचा विचार करून अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. मयेकर यांच्या नेतृत्वाखाली आता १६० सुरक्षा रक्षक, ११ सुरक्षा पर्यवेक्षक आणि एक सहाय्यक सुरक्षा अधिकारी कार्यरत असतील. रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्था, परिसरातील शिस्त, वाहन पार्किंग, गर्दीचे व्यवस्थापन तसेच रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मदत करणे ही त्यांच्या पथकाची जबाबदारी असेल.

मयेकर यांची भूमिका केवळ सुरक्षेपुरती मर्यादित नाही. रुग्णालयात येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना मदत करणे, वाहन पार्किंगची व्यवस्था सुरळीत ठेवणे आणि रुग्णालयातील नागरिकांना आवश्यक वेळी मदतीचा हात देणे, अशी कामे ते प्रत्यक्ष करताना दिसतात. त्यामुळे 'सेवा' हा त्यांच्या कार्याचा महत्त्वाचा भाग बनला आहे. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद सांगवीकर यांच्या नेतृत्वाखाली प्रशासकीय कामकाजाला सुरक्षा व्यवस्थेच्या पातळीवर सक्षम पाठबळ देण्याचे कामही मयेकर करत आहेत.

कोविड-१९ महामारीच्या काळातही मयेकर यांनी दिवस-रात्र कर्तव्य बजावत रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्था आणि नागरिकांच्या मदतीची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. या काळातील त्यांच्या सेवाभावाचीही दखल घेण्यात आली आहे. सुरक्षा रक्षक म्हणून सुरू झालेला प्रवास आता १६० सुरक्षा रक्षकांच्या पथकाचे नेतृत्व करण्यापर्यंत पोहोचला आहे. त्यांच्या या नियुक्तीचे रुग्णालयातील कर्मचारी आणि सहकाऱ्यांकडून स्वागत होत आहे.
📲Get App