🔥 TRENDING SAD Government to End ‘Inspector Raj’... Punjab Women Cyclists Set New Records,... Newborn’s Body Discovered in Bush Near... Guna District Court Orders Rs68 Lakh C... 16-Year-Old Runs Away Over Unfulfilled... Jaipur dairy plant sealed after 35,000...
03 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

पिंपळनेरमध्ये गुटखा तस्करी उघड; ३० लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांवर गुन्हा....!!

✍️ Reporter: Maheshprasad Ramkrishnaprasad Dixit 🗓 03 Nov 2026, 02:59 PM 👁 12
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विभागीय प्रतिनिधी

धुळे : राज्यात बंदी असतानाही चोरट्या मार्गाने होणारी गुटखा, पानमसाला आणि तंबाखूची विक्री अन्न व औषध प्रशासनाने उधळून लावली. पिंपळनेर येथे पहाटे केलेल्या धडक कारवाईत प्रशासनाने ३० लाख ९१ हजार ९०० रुपये किमतीचा २० हजार ३८२ पॅकेट्सचा साठा जप्त केला. या प्रकरणी तिघांविरुद्ध पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

प्रशासनाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पिंपळनेरमध्ये गुपचूप प्रतिबंधित गुटख्याची विक्री सुरू असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचला. ३ नोव्हेंबर रोजी पहाटे सुमारे २ वाजता सटाणा रोडवरील ईदगापाडा परिसरात भारत गॅसजवळ दोन वाहनांची तपासणी करण्यात आली. एमएच ४६ बीएम ६०९७ आणि एमएच ४६ बीयू ७८८५ या क्रमांकांच्या वाहनांमध्ये प्रतिबंधित पदार्थांचा मोठा साठा आढळला.

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल पुढील कारवाईसाठी पिंपळनेर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे. साहेबराव वंजी साबळे, गणेश वंजी साबळे आणि संदीप गुलाब ठाकरे, तिघे राहणार बल्हाणे, तालुका साक्री, जिल्हा धुळे, अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

आयुक्त तुकाराम मुंडे, सह आयुक्त (अन्न) मंगेश माने, सहायक आयुक्त (अन्न) गोपाल माहोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद पवार, शशिकांत राणे, अरविंद राऊत आणि मंगेश भावसार यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली. प्रतिबंधित पदार्थांच्या विक्रीविरोधात यापुढेही अशाच कठोर कारवाया सुरू राहतील, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
📲Get App